जाऊबाई जोरात! मालमत्तेच्या वादावरून दोघींमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकींना नाल्यात लोळवलं
Two Women Fight Viral Video : मालमत्तेच्या वादात दोन महिलांनी एकमेकींना नाल्यात लोळवत मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Trending News : आई-वडीलांच्या संपत्तीच्या वादातून मुलांमध्ये होणारी भांडण काही नवीन नाही. अनेक वेळा संपत्तीच्या वादातून भावाभावांमध्ये झालेली भांडण चर्चेचा विषय ठरतात. बहुतेक वेळा नातेवाईकांमध्येही भांडण झाल्याचं दिसून येतं. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून दोन जाऊबाईंमध्ये जोरदार भांडण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये ही घटना घडली आहे.संपत्तीच्या वादातून दोन जावांमध्ये ही हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. मालमत्तेवरून झालेल्या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. एकाच कुटुंबातील दोन महिलांना एकमेंकींना चांगलाच चोप दिला. भांडताना नाल्यात पडल्यानंतरही त्यांची हाणामारी सुरुच राहीली. दोघींनी एकमेकींना नाल्यात लोळवून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
अजमेर के करोड़पति घर की देवरानी-जेठानी में हुआ विवाद, लड़ते लड़ते नाले में गिरी pic.twitter.com/XQbT1XKrs0
— The Fact Factory. (@FactTheFactory) June 17, 2022
या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला नाल्यात भांडताना दिसत आहेत. यादरम्यान, तिसरी महिला देखील भांडणासाठी नाल्यात उडी मारते, त्यानंतर भांडण चांगलच विकोपाला जात. पुढे एका पुरुष नाल्यात उडी मारत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करतो.
पुरुषाने महिलेल्या मारहाण केल्यानंतर दुसऱ्या माणसाला राग येतो आणि तो नाल्यात उतरलेल्या व्यक्तीवर लाथांचा वर्षाव करतो. त्यानंतरही हा वाद थांबताना दिसत नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांना पाचारण केल्यानंतर संपूर्ण गोंधळ शांत झाला. या प्रकरणी पोलिसांनी भांडण करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेलं आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.