(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending : शाळेतील कंटाळवाणा वर्ग अचानक झाला मजेशीर! शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
Trending News : दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
Class Teacher Dance With Student : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात, ज्यामध्ये अनेक मनोरंजक आणि अनेक हृदय जिंकणारे व्हिडिओ असतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, या व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात एका विद्यार्थीनीसोबत नाचताना दिसत आहे.
शिक्षिकेचा विद्यार्थीनीसोबत डान्स व्हायरल
शाळेच्या दिवसात आपण सर्वांनी खूप धमाल-मस्ती केली असेल, कधी यासाठी शिक्षकांना नावं ठेवली असेल. मात्र आता काळ खूप बदलला आहे. शिक्षक आता मुलांशी अतिशय सौम्यपणे वागताना दिसतात. ज्यामुळे ते एकाच वेळी अधिकाधिक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात तसेच विद्यार्थ्यापर्यंत आपले म्हणणे मांडतात. सध्या असाच एक शिक्षक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये शिक्षिका त्यांचा वर्ग मजेशीर आणि आनंददायक बनवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीतील एका सरकारी शाळेतील इंग्रजी शिक्षिका मनू गुलाटी आपल्या विद्यार्थिनीसोबत डान्स करताना दिसत आहे.
Students love to be teachers. They love role reversal.
— Manu Gulati (@ManuGulati11) April 25, 2022
"मैम आप भी करो। मैं सिखाऊंगी।"
English lang teaching followed by some Haryanvi music- A glimpse of the fag end of our school day.☺️#MyStudentsMyPride #DelhiGovtSchool pic.twitter.com/JY4v7glUnr
सोशल मीडियावर व्हिडिओला जवळपास 60 हजार व्ह्यूज
हा व्हिडिओ मनू गुलाटीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुलीने तिच्या डान्स स्टेप्स दाखवताच गुलाटीही त्यांची कॉपी करताना दिसत आहे. ज्यावर इतर विद्यार्थी आपल्या शिक्षकासाठी टाळ्या वाजवताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला जवळपास 60 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी 3 हजार युजर्सनी व्हिडिओला लाईक केले आहे. तसेच इतर युजर्सकडून शिक्षकाचे त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : पर्यटकांच्या वाहनामध्ये घुसला सिंह, अन्...
- Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
- Viral : माकडाकडून तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा...