(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marriage In Air Viral Video : 400 फूट उंचीवर हवेत या जोडप्याने लग्न केले! व्हिडीओ पाहून सारेच हादरले
Marriage In Air Viral Video : लग्नाला खास बनवण्यासाठी कपल्सही खूप मेहनत घेतात. मात्र त्याच वेळी, काही लोक अशा गोष्टी करतात, ज्या आश्चर्यकारक असतात.
Marriage In Air Viral Video : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाला खूप महत्त्व असते, त्यामुळे आपला विवाह सोहळा आयुष्यभर स्मरणात राहावा, तसेच आपला विवाह सोहळा भव्य आणि खास व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्नाला खास बनवण्यासाठी कपल्सही खूप मेहनत घेतात. मात्र त्याच वेळी, काही लोक अशा गोष्टी करतात, ज्या आश्चर्यकारक आहेत. एका जोडप्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. विशेषत: ज्यांना उंचीची भीती वाटते, ते असे लग्न कधीच करणार नाहीत.
400 फूट उंचीवर चक्क हवेत लग्न
आता या व्हिडिओबद्दल सविस्तर बोलायला गेलं तर, एका विदेशी जोडप्यानी चक्क हवेत 400 फूट उंचीवर लग्न केल्याचे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल. लग्नाला काहीसं धाडसी रुप देण्यासाठी या जोडप्याने ही करामत केली आहे.
View this post on Instagram
स्लॅक लाईनवर उभे राहून लग्न
या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही लोकही या जोडप्यासोबत उपस्थित असल्याचे दिसेल. सर्वजण 400 फूट उंचीवर पर्वतांच्या मधोमध स्लॅकलाइनवर उभे आहेत. हे केवळ भितीदायक नाही तर ते आश्चर्यकारक देखील आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील उटाह येथील आहे.
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मॅटाडॉरनेटवर्क नावाच्या अकाऊंटसह पोस्ट करण्यात आला आहे. 30 जुलै रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 दशलक्षाहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. व्हिडीओवर 36 हजारांहून अधिक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत.
लग्नाच्या दिवशी भरमंडपात भांडण
लग्न सोहळ्यातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत वधू-वरांची मंडपातील हे भांडण (Viral Video Of Groom & Bride) त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहील. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक जोडपे त्यांच्या लग्नाच्या दिवशी मंडपात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
इतर संबंधित बातम्या
- Fetus Inside Egyptian Mummy : 2000 वर्ष जुन्या इजिप्शियन ममीच्या पोटात 28 महिन्यांचा गर्भ, आतापर्यंत कसा राहिला सुरक्षित?
- Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या 'ममी'चं गूढ उलघडणार, इटलीतील प्रयोग