(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fetus Inside Egyptian Mummy : 2000 वर्ष जुन्या इजिप्शियन ममीच्या पोटात 28 महिन्यांचा गर्भ, आतापर्यंत कसा राहिला सुरक्षित?
Fetus Inside Egyptian Mummy : इजिप्शियन ममीच्या पोटात सापडलेल्या 2000 वर्ष जुन्या गर्भाचे गूढ उकलले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की हा भ्रूण आम्लीकरण प्रक्रियेद्वारे संरक्षित करण्यात आला होता.
Fetus Inside Egyptian Mummy : इजिप्तमध्ये एका ममीच्या पोटात सापडलेल्या 28 महिन्यांच्या गर्भाचे गूढ उकलले आहे. हा गर्भ गेली 2000 वर्षे आईच्या पोटात सुरक्षित होता. 2021 मध्ये त्याचा शोध लागल्यापासून ते शास्त्रज्ञांसाठी एक गूढच बनले होते. महिलेच्या शरीर छिन्नविछिन्न झाल्यानंतर हा भ्रूण आम्लीकरण म्हणजेच अॅसिडिफिकेशनद्वारे (Acidification) संरक्षित करण्यात आल्याचे आता सांगण्यात येत आहे. ही प्रक्रिया लोणची साठवण्यासारखीच आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, वॉर्सा विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने सीटी आणि एक्स-रे स्कॅनद्वारे न जन्मलेल्या मुलाच्या अवशेषांची उपस्थिती उघड केली.
जगातील सर्वात जुना भ्रूण
हा जगातील सर्वात जुना गर्भ असल्याचे मानले जाते. हा भ्रूण सुमारे 200 वर्षांपूर्वी इजिप्तमधून पोलंडमध्ये नेण्यात आला होता. ही ममी डिसेंबर 1826 मध्ये वॉर्सा विद्यापीठाला दान करण्यात आली होती. तेव्हा असे मानले जात होते की ही ममी एका महिलेची आहे, परंतु 1920 च्या दशकात त्यावर इजिप्शियन धर्मगुरूचे नाव लिहिलेले आढळले. युनिव्हर्सिटी टीम 2015 पासून या प्राचीन इजिप्शियन ममीवर काम करत आहे. गेल्या वर्षी स्कॅनमध्ये मम्मीच्या पोटात एक लहान पाय दिसला.
बाळंतपणात महिलेचा मृत्यू झाला नाही
संशोधकांनी गर्भाची स्थितीचा अभ्यास केला आणि सांगितले की या रहस्यमय महिलेचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला नाही. मृत्यूच्या वेळी या महिलेच्या पोटात 26 ते 30 आठवड्यांचा गर्भ होता. संशोधकांना आशा आहे की इतर गर्भवती ममी देखील जगभरातील विविध संग्रहालयांमध्ये ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्या सर्व तपासल्या पाहिजेत. रहस्यमय स्त्री आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाचा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पॅलिओपॅथॉलॉजिस्ट मार्जेना ओलारेक-सिल्के आणि पोलंडमधील वॉर्सा विद्यापीठातील सहकाऱ्यांनी अभ्यास केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day : 'कर चले हम फिदा...', प्रजासत्ताक दिनी ITBP जवानाने गायलं गाणं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
- Republic Day 2022 : ITBP जवानांनी उणे 30 अंश तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन, 15 हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा
- Mr. & Mrs. Mahi : क्रिकेटच्या मैदानावर उतरली जान्हवी कपूर, 'या' बड्या क्रिकेटपटूकडून घेतेय ट्रेनिंग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha