Kili Paul : 'पतली कमरिया' या भोजपुरी गाण्यावर टांझानियाच्या 'किली पॉल'ने मारले ठुमके; चाहते म्हणाले...
Trending Dance Video : व्हायरल व्हिडिओमध्ये किली पॉल त्याची बहीण निमा पॉलबरोबर 'पतली कमरिया' या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.
Trending Dance Video : टांझानियामधील लोकप्रिय कॉंटेंट क्रिएटर (Content Creator), किली पॉल (Kili Paul) अनेकदा भारतातील नवीन ट्रेंडवर डान्स करताना किंवा बॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स बनवताना दिसतो. भारतीय यूर्नसना किलीचे व्हिडीओ इतके आवडतात की ते त्याच्या प्रत्येक नव्या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहतात. किली पॉलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल त्याची बहीण निमा पॉलबरोबर (Neema Paul) "पतली कमरिया" गाण्यावर लिप्सिंग आणि डान्स करताना दिसतोय.
भोजपुरी गाणं "पतली कमरिया" हा सध्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट डान्स ट्रेंड आहे. भारतीय यूजर्सना ही रील खूप मनोरंजक वाटत आहे. त्यातही भारताबाहेरील लोक बॉलिवूड किंवा भोजपुरी गाण्यांवर कसे नाचतात, कसे लिप्सिंग करतात याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. हा व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या गाण्यावर ठुमके मारायची इच्छा होईल.
व्हायरल डान्स व्हिडीओ :
View this post on Instagram
आजकाल हे भोजपुरी गाणं इंस्टाग्रामवर टॉपवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ स्क्रोल करताना 'पतली कमरिया मोरी ही हाय' हे गाणं ट्रेंड होत असताना किली पॉल त्यात मागे कसा राहणार? त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चाहते उत्सुक झाले. किली पॉलच्या सिंपल डान्स मूव्ह्स अनेक चाहत्यांना आकर्षित करतात. त्याच्या या व्हिडीओवर तब्बल 2 लाखांहून अधिक यूजर्सने लाईक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Kili Paul : टांझानियाचा किली पॉल बॉलिवूडच्या प्रेमात; किंग खानच्या 'या' गाण्यावर केलं लिप्सिंग