(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kili Paul : टांझानियाचा किली पॉल बॉलिवूडच्या प्रेमात; किंग खानच्या 'या' गाण्यावर केलं लिप्सिंग
Kili Paul : सोशल मीडियावर किली पॉलचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Kili Paul : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. या सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स केला जातो. तर, कधी कॉमेडी रिल्स शूट केले जातात. कधी गाणी गायली जातात तर कधी प्रेमाच्या शायरी देखील बोलल्या जातात. सध्या सोशल मीडियावर टांझानियाच्या (Tanzania) किली पॉलची Kili Paul जोरदार चर्च होतेय. हा किली पॉल कोण आहे? त्याची इतकी चर्चा का होतेय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर जाणून घेऊयात किली पॉलबद्दल...
किली पॉल हा मूळचा टांझानियाचा आहे. सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे सध्या 4.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये व्हिडीओ क्रिएटर (Video Creator) अशी ओळख दिली आहे. किली पॉल हा अनेक बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसतो. कधी तो बॉलिवूड चित्रपटातील विनोदी डायलॉगही बोलतो तर कधी फक्त आपल्या हावभावांनी एक्शन करून अनेकांना तो हसवतो. किलीच्या याच टॅलेंटचे अनेकजण चाहते आहेत. विशेष म्हणजे, किलीने त्याच्या व्हिडीओमध्ये आपल्या बहिणीला म्हणजेच निमा पॉलला देखील सामील करून घेतो.
बॉलिवूडच्या गाण्यावर केले लिप्सिंग
View this post on Instagram
किलीच्या बऱ्याच व्हिडीओमधून त्याला बॉलिवूडच्या गाण्यांची विशेष आवड आहे असे दिसते. अनेकदा तो बॉलिवूडच्या गाण्यांवर लिप्सिंगही करताना दिसतो. सध्या असाच ट्रेंड असलेल्या मोहोब्बते सिनेमातील 'हम को हमी से चुरालो' या शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या सिनेमातील हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल लिप्सिंग करताना दिसतोय. त्याच्या या व्हिडीओला अनेक यूजर्सने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Dancing Dadi: सोशल मीडियावर 'डान्सिंग दादींची' हवा; 64 वर्षाच्या आजींचा तरुणांनाही लाजवेल असा डान्स