Viral Video : आतापर्यंत तुम्ही गाजराचा हलवा खाल्ला आहे, पण गाजर हलव्याच्या आईस्क्रिम रोलची चव तुम्ही चाखलीय का? पाहा हा व्हिडीओ
Viral Video : सध्या सोशल मीडियावर गाजर हलवा आईस्क्रीम बनवणारी व्यक्ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा माणूस गाजराच्या पुडिंगमध्ये क्रीम टाकून आईस्क्रीम रोल बनवताना दिसत आहे.
Viral Video : अनेक दिवसांपासून रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते (street food vendors) देशभरात खाल्ल्या जाणाऱ्या सर्व आवडत्या खाद्यपदार्थांवर प्रयोग करताना दिसतात. अलीकडच्या काळात, फूड ब्लॉगर्स (Food bloggers) अशा स्ट्रीट फूड (street food) विक्रेत्यांचे अनोखे पदार्थ देशासमोर आणण्याचे काम करताना दिसतात. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तर काही जण विरोध करताना दिसत आहेत.
पूर्वी फ्रूट टी, मॅगी आईस्क्रीम रोल्स आणि मसाला डोसा आईस्क्रीमनंतर आता गाजर पुडिंग आईस्क्रीम यूजर्ससमोर आले आहे. ज्याला यूजर्सचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते दोन वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ एकत्र करून नवीन खाद्यपदार्थ तयार करताना दिसतात. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
पाहा हा व्हिडीओ :
नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता गाजराचा हलवा घेऊन आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. सर्वप्रथम, ती व्यक्ती प्लॅटफॉर्मवर गाजराचा हलवा टाकताना दिसते, त्यानंतर तो त्यात मलाई मिक्स करतो. नंतर ते हे मिश्रण थंड करतो. आणि त्यानंतर त्याचे रोल्स बनवतो.
सध्या सोशल मीडियावर गाजराच्या हलव्याचे आईस्क्रीम बहुतांश यूजर्सने पसंत केले आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे गाजराचा हलवा आणि आईस्क्रीम या दोन्ही पदार्थांची चव गोड असते, त्यामुळे ते सर्वाधिक पसंत केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral video : प्राण्यांमध्ये देखील 'पुष्पा' ची क्रेझ; श्रीवल्ली गाण्यावर साँगवर हुकस्टेप करतोय गोरिला
- Viral Video : सुनेची सासूला बेदम मारहाण, एक रोटी जास्त खाल्ल्याचा राग
- महिलेनं 21 दिवसांत 15 लोकांना डेट केलं अन् प्रेमावर पुस्तक लिहिलं! आता म्हणतेय...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha