महिलेनं 21 दिवसांत 15 लोकांना डेट केलं अन् प्रेमावर पुस्तक लिहिलं! आता म्हणतेय...
Viral Story : या रेकॉर्डनंतर हेलन चिकने डेटिंगवर एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये तिने टिंडरवर खरे प्रेम शोधण्याच्या टिप्स दिल्या आहेत.
Viral Story : काही लोकांना असा छंद असतो की, ते सतत वेगवेगळ्या लोकांना भेटतात आणि त्यांच्याशी ओळख वाढवतात. पण, काही लोक तर याबाबतीत रेकॉर्डचं तोडतात. असाच रेकॉर्ड एका महिलेनेही मोडलाय. हेलन चिक (Helen Chik) या घटस्फोटित महिलेने सांगितले की, तिने 21 दिवसांत तब्बल 15 लोकांना डेट केले आहे. या महिलेने डेट केलेली सगळीच मंडळी न्यूयॉर्कमधील आहेत. या बाई एक लेखिकाही आहेत. तिने स्वतःचे अनुभव तिच्या पुस्तकातून लोकांसमोर मांडले आहेत.
डेली स्टारच्या बातमीनुसार, हेलन चिक या महिलेने डेटिंगवर एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये तिने टिंडर या अॅपवर खरे प्रेम शोधण्याच्या टिप्स देखील दिल्या आहेत.
ऑनलाईन प्रेम शोधण्याचा संघर्ष!
हेलनच्या पुस्तकाचे नाव आहे ‘सेक्स, स्वाइप अँड अदर स्टोरीज’. या पुस्तकामध्ये तिने ऑनलाईन प्रेम शोधण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. हेलनचा असा दावा आहे की, आधुनिक काळात रोमान्सच्या शोधात असलेल्या लोकांचा तिला पाठिंबा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यानही तिने डेटिंगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याचवेळी हेलनने खुलासा केला की, न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान तिने केवळ 21 दिवसांत 15 लोकांना डेट केले.
हेलनचा स्वतःच दोन वेळा घटस्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या घटस्फोटाबद्दलही अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. घटस्फोटाबाबत अनेक लोकांची विचारसरणी अजूनही पारंपारिक आणि जुनाट आहे. मात्र, यात खुल्या मनाचेही अनेक लोक आहेत.
21 दिवसांत 15 लोकांना डेट करण्याचा अनुभव सांगताना हेलन म्हणाली की, ‘वेळ हे अशी गोष्ट आहे, जी परत परत येत नाही. त्यामुळे मी वेळेबाबत खूप वक्तशीर आहे. जेव्हा तुम्ही नवीन शहरात जाता, तेव्हा तुम्हाला ठिकाणे बदलावी लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही अशा लोकांना भेटता, ज्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या ओळखतही नाही.’
हेही वाचा :
- Trending News : मुलीच्या घरी डेटसाठी गेला अन् अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; कारण माहितीये?
- Viral Signature : 'हे तर साळिंदर'; मेडिकल कॉलेजमधील अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने मीम्स आणि जोक्सचा पाऊस
- Viral Video : चहाप्रेमींनो 'हा' 'फ्रुट टी' प्यायलात का? सुरतमध्ये मिळतोय सफरचंद, केळी आणि चिकूचा चहा; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha