New Delhi: 'कुली' नंबर 756... राहुल गांधी हातात बिल्ला अन् लाल शर्ट घालून पोहोचले आनंद विहार रेल्वे स्टेशनवर
Rahul Gandhi became Coolie: काँग्रेस खासदार राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले, जिथे त्यांनी हमालांची भेट घेतली. हमालांचा लाल गणवेश परिधान करुन त्यांनी डोक्यावर सामानही उचललं.
Rahul Gandhi Interects With Coolies: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी (21 सप्टेंबर) दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचून हमालांची भेट घेतली. या दरम्यान राहुल गांधींनी हमालांचा लाल गणवेश (Rahul Gandhi in Coolie Uniform) परिधान केला आणि हाताला 756 नंबरचा बिल्ली देखील लावला. एका हमालाच्या मदतीने त्यांनी आपल्या हाताच्या दंडावर बिल्ला बांधला. विशेष म्हणजे, यानंतर राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचं सामान देखील डोक्यावर उचललं आहे.
राहुल गांधींनी हमालांना दिलं आश्वासन
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हमाल आणि रिक्षाचालक खूप आनंदी दिसत होते. हमालांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटलं की, "राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, ते आम्हा हमालांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील."
काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिलं आहे की, "राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आपल्या हमाल बांधवांची भेट घेतली. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या हमाल बांधवांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर आज राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. राहुल गांधी यांनी मनमोकळेपणाने सर्व हमालांशी संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरूच आहे."
VIDEO | Congress leader Rahul Gandhi meets railway porters at Anand Vihar Railway Station in Delhi, wears porter dress and badge. pic.twitter.com/wYqOGOmB2v
— Press Trust of India (@PTI_News) September 21, 2023
राहुल गांधींचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल
भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी देशातील विविध समाज घटकांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. याआधी देखील राहुल गांधींनी मेकॅनिकची भेट घेतली होती, छोट्या उद्यागांतील कुकची भेट घेतली होती आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधींबद्दल विशेष बाब म्हणजे, ते ज्यांना भेटायला जातात तिथे अगदी त्यांच्यासारखे आणि त्यांच्या वेशातच वावरतात. त्यामुळेच राहुल गांधी यांचे असे फोटो, व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात आणि जनतेच्या पसंतीस देखील उतरतात.
हेही वाचा:
India: राहुल गांधी बनले मास्टरशेफ; तामिळनाडूतील फॅक्टरीत बनवले चॉकलेट, पाहा फोटो