Video : ‘असनी’ वादळात समुद्र किनारी वाहून आला रहस्यमयी सोनेरी रथ! पाहा व्हिडीओ...
Gold-Coloured Chariot : मंदिरासारखा दिसणारा हा रथ एखाद्या जवळच्या देशांतून वाहत इथपर्यंत आला असावा असा संशय पोलिसांना आहे. उसळत्या लाटांमध्ये अडकलेल्या या रथाला स्थानिक लोकांनी खेचत किनाऱ्यावर आणले आहे.
Gold-Coloured Chariot : बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशातील उत्तर किनारी जिल्ह्यातील श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीजवळ बंगालच्या उपसागरात एक रहस्यमयी सोनेरी रथ (Gold-Coloured Chariot Trending) वाहून आला आहे. या रथाला पाहून स्थानिक लोक चांगलेच गोंधळात पडले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे ‘असनी’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम भागात वादळामुळे समुद्रात उसळलेल्या लाटांमध्ये हा सोन्याचा रथ वाहून किनाऱ्याशी आला आहे.
मंदिरासारखा दिसणारा हा रथ एखाद्या जवळच्या देशांतून वाहत इथपर्यंत आला असावा असा संशय पोलिसांना आहे. उसळत्या लाटांमध्ये अडकलेल्या या रथाला स्थानिक लोकांनी खेचत किनाऱ्यावर आणले आहे. त्यानंतर पोलिसांनी हा रथ ताब्यात घेतला आहे.
पाहा व्हिडीओ :
रहस्यमयी हा रथ आतापर्यंत कसा आला याची कोणालाच कल्पना नाही. असनी चक्रीवादळामुळे सध्या समुद्र चांगलाच खवळला आहे. समुद्रात अतिप्रचंड लाटा उसळत आहेत. त्यामुळेच हा रथ वाहून वाहून येथे आला असावा, असे म्हटले जात आहे. हा रथ लोखंडाचा असून, त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. मंदिर आणि कळस अशा आकाराच्या या रथात कुणीही व्यक्ती उपस्थित नव्हती.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील लोक रथाला पाण्यातून बाहेर काढून, किनाऱ्यावर आणताना दिसत आहेत. नौपाडाच्या उपनिरीक्षकांनी सांगितले की, या घटनेची माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली आहे. ‘रथ दुसऱ्या देशातून इथे आला असावा. आम्ही गुप्तचर आणि उच्च अधिकाऱ्यांना कळवले आहे,’ असे एसआयने सांगितले.
‘असनी’ वादळाचा फटका
बंगालच्या उपसागरात निर्णाम झालेल्या असनी चक्रीवादळाचा अनेक ठिकाणी परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसत आहे. असनी चक्रीवादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. ओडिशातील गंजम जिल्ह्यात 6 बोटी बुडाल्याची घटना घडली. पण वेळीच परतीचा अलर्ट मिळाल्याने जीवितहानी टळली आहे. त्यामुळे 60 मच्छीमार समुद्रातून सुखरुप बाहेर आले.
असनी चक्रीवादळ हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे 330 किमी अंतरावर आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 'असनी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत.
हेही वाचा :