GK: जगातील सर्वात महागडं घर कोणतं? भारताचा इथेही आहे दबदबा
Most Expensive House: घर खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, खास म्हणजे जेव्हा ते आपल्या स्वप्नातलं घर असतं. आज जगातील सर्वात महागड्या घराबद्दल जाणून घेऊया.
Most Expensive House: एक जबरदस्त आकर्षक घर (House) म्हणजे कायमच्या संपत्तीचा खजिनाच असतो, विशेषत: जर ते घर सुंदर असं कोट्यवधी रुपयांचं असेल तर. नेहमी असं बोललं जातं की, लोक त्यांच्या स्वप्नातील घर (Dream House) खरेदी करु इच्छितात किंवा बनवू इच्छितात, ज्यात त्यांच्या मनाप्रमाणे डिझायनिंग असेल.
जगभरातील महागडी घरं ही केवळ त्यांच्या देखाव्यामुळेच नव्हे, तर आलिशान सोयीसुविधा, अंतर्गत जागा (Interior Design) आणि घराच्या ठिकाणामुळे देखील खूप प्रभावी आहेत. आज जगातील सर्वात महागड्या घरांबद्दल जाणून घेऊया, जिथे राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे.
याहून महागडं घर बनलंच नाही
लंडनच्या (London) वेस्टमिन्स्टर शहरात असलेलं बकिंघम पॅलेस (Buckingham Palace) हे जगातील सर्वात महागडं घर आहे. 2023 मधील सर्वात महागड्या घराचा किताब या पॅलेसच्या नावावर आहे. हा राजवाडा ब्रिटिश राजघराण्याच्या मालकीचा आहे आणि 1837 पासून ते ब्रिटनच्या सम्राटांचं लंडनमधील अधिकृत निवासस्थान आहे आणि आता हे राजाचं अधिकृत मुख्यालय देखील आहे. बकिंघम पॅलेस (Buckingham Palace) हे अधिकृतपणे जगातील सर्वात श्रीमंत घर आहे.
या राजवाड्यात 775 बेडरूम, 78 बाथरूम, 52 रॉयल आणि गेस्ट रूम, 92 कार्यालयं आणि 19 राजकीय कक्ष आहेत. क्षेत्राच्या दृष्टीने, हा राजवाडा अंदाजे 828000 चौरस फूट आहे आणि राजवाड्याची एकटी बागच 40 एकरची आहे. हा राजवाडा कधी विक्रीसाठी गेला, तर त्याची किंमत अंदाजे 1.3 अब्ज डॉलर्स असेल.
भारताचाही या यादीत दबदबा
मुंबईतील अँटिलीया हे जगातील दुसर्या क्रमांकाचं सर्वात महागडं घर आहे. हे घर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यासाठी तयार केलं गेलं होतं. मुकेश अंबानी हे फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
हे घर शिकागो आधारित ‘पर्किन्स अँड विल’ नावाच्या आर्किटेक्चर फर्म आणि हॉस्पिटॅलिटी डिझाईन फर्म, ‘हर्श बेंडर असोसिएट्स’ यांनी बनवलं आणि डिझाईन केलं आहे. 4,00,000 चौरस फूट क्षेत्र असलेलं हे घर मुंबईच्या कुंबल्ला हिल शेजारी असून ही इमारत 27 मजले उंच आहे.
अँटिलीया ही इमारत भूकंप प्रतिरोधक आहे, जी 8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा प्रतिकार करू शकते. अँटिलियाचे सहा मजले हे मालक आणि अतिथी यांच्या कार पार्किंगसाठी समर्पित आहेत. या घरात हेल्थ स्पा, एक आईस्क्रीम रूम, एक मंदिर, 50-आसनी चित्रपटगृह, एक सलून, तीन हेलिपॅड आणि एक बॉलरूम आहे. भव्य अशा या हवेलीमध्ये 600 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
हेही वाचा:
Snake Farming: 'या' गावात केली जाते चक्क सापांची शेती; व्यवसायातून गावातील प्रत्येकजण श्रीमंत