Snake Farming: 'या' गावात केली जाते चक्क सापांची शेती; व्यवसायातून गावातील प्रत्येकजण श्रीमंत
Snake Farming: तुम्ही फळं-फुलांच्या शेतीबद्दल ऐकलं असेल, पण कधी सापांच्या शेतीबद्दल ऐकलंय का? हो, हे खरंय. एक असंही गाव आहे जिथे सापांची शेती केली जाते.
Snake Farming: शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हटलं जातं. पुर्वी लोकांच्या हाताला काम नसायचं तेव्हा ते शेतीवर (Farming) आपला उदरनिर्वाह करायचे. आजच्या प्रगत तंत्रज्ञामुळे लोक आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत, ज्याच ते लाखो-करोडो रुपये कमवतात. लोक विविध फळांची, फुलांची आणि भाज्यांची शेती करत आहेत. पण जगात असंही एक गाव आहे, जिथे चक्क सापांची (Snake) शेती केली जाते, महत्त्वाचं म्हणजे यातून गावातील सर्व शेतकरी श्रीमंत बनले आहेत.
कोणत्या गावात होते सापांची शेती?
तर चीनमधील (China) एका गावात सापांची शेती (Snake Farming) केली जाते. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावातील लोक साप पाळून आपला उदरनिर्वाह चालवतात. या गावातील प्रत्येक व्यक्ती याच व्यवसायावर अवलंबून आहे. या गावात लाखो विषारी साप पाळले जातात. या गावातील लोक किंग कोबरापासून ते अजगरासारखे साप पाळतात. या गावातील लोक सापांचं मांस आणि शरीराच्या अन्य भागांसाठी त्यांची शेती करतात. या गावातील सापांना अमेरिका, रशियासह कोरिया, जर्मनासारख्या अनेक देशांत मोठी मागणी आहे.
विविध कामांमध्ये केला जातो वापर
चीनमध्ये सापाचं मांस अतिशय आवडीने खाल्लं जातं. याशिवाय सापाचे अवयव औषध बनवण्यासाठीही वापरले जातात. तर अनेक प्रजातींचे साप पिशव्या, शूज आणि बेल्ट इत्यादी बनवण्यासाठी वापरले जातात. या गावात लाकूड आणि काचेच्या छोट्या पेटीत साप पाळले जातात. सापाची पिल्लं मोठी झाल्यावर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो.
साप मोठे झाल्यावर पुढे काय?
नंतर साप मोठे झाल्यावर त्यांना मारण्यासाठी फार्म हाऊसच्या बाहेर नेलं जातं. सर्व प्रथम त्यांचं विष बाहेर काढलं जातं. त्यानंतर त्याचं डोकं कापलं जातं. मग त्यांचं मांस बाहेर काढून बाजूला ठेवतात. सापाची कातडी सुकवण्यासाठी वेगळी ठेवली जाते आणि मांसापासून औषध बनवलं जातं. बाजारात चामड्याचे पदार्थ खूप महाग विकले जातात, त्यामुळे यातून हे लोक चांगले पैसेही कमावतात.
जिसिकियाओ गावात 30 लाखांहून अधिक साप पाळले जातात. या गावात 1980 पासून साप पालनाचा व्यवसाय केला जातो. भारतात मात्र साप पालनावर बंदी आहे. त्याचं विषही काढण्यास कायदेशीर परवानगी नाही. यामुळे भारतात सापांची तस्करी, सापांच्या विषाची तस्करीविरोधात गुन्हेही दाखल होतात.
हेही वाचा:
Trending: केवळ एक-दोन नाही, तर तब्बल 500 हून अधिक विवाह; 'हा' आहे इतिहासातील नावाजलेला राजा