(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : गाढवानं कुत्र्याला घडवली अद्दल, नक्की काय घडलं तुम्हीच पाहा
Trending Video : सध्या सोशल मीडियावर दोन कुत्रे आणि एका गाढवाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये गाढव कुत्र्याला उचलून जमिनीवर आपटताना दिसत आहे.
Donkey Dog Fight Video : सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये कधी रोमांचक तर कधी मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे (Animals) व्हिडीओ (Animals) भरपूर व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असताना की, ते पाहिल्यानंतर हसू आवरणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर दोन कुत्रे आणि एका गाढवाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये गाढव कुत्र्याला उचलून जमिनीवर आपटनाता दिसत आहे.
गाढवानं कुत्र्याला घडवली अद्दल
या व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रे गाढवाला विनाकारण त्रास देताना दिसत आहे. विनाकारण कुणाला त्रास देणं चुकीचं आहे, असं करणं किती महागात पडू शकतं हे तुम्हाला हा व्हिडीओ बधून लक्षात येईल. दोन कुत्र्यांनी एका गाढवाला चांगलंच हैराण केलं. पण नंतर मात्र कुत्र्यांना गाढवाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
इसलिए अनावश्यक किसी की 'शांति भंग' न करें..!
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) July 2, 2022
😅 pic.twitter.com/9BeHYHRrtL
पुन्हा वाट्याला येऊन नका...
कुत्र्यांनी हैराण केलेला गाढव नंतर चांगलाच भडकल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक गाढव रस्त्यावर उभा आहे. यावेळी दोन कुत्रे गाढवाला विनाकारण त्रास देतात. यानंतर गाढवाला राग अनावर होतो आणि तो एका कुत्र्याला पकडून जमिनीवर जोरदार आपटतो.
चिडलेल्या गाढवाने आधी कुत्र्याचा पळत माग काढला आणि नंतर त्याचे मागचे दोन्ही पाय पकडून त्याला हवेत भिरकावलं. यानंतर कुत्रा जमिनीवर जोरात आदळतो. यानंतर कुत्रा विजेच्या वेगाने तेथून धूम ठोकून पळ काढतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
व्हायरल झाला मजेदार व्हिडीओ
हा मजेदार व्हिडीओ झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'यामुळे विनाकारण 'शांतता भंग करू नका..!'. हा 11 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत 1.88 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर देखील केलं आहे.
संबंधित इतर बातम्या