(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : 'मायेची उब'; दिवंगत वडिलांच्या शर्टांपासून तयार केली गोधडी; मुलीनं दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे.
Viral Video : कुटुंबातील व्यक्तीला गमावल्याचे दु:ख अनेकांना विसरता येत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावणे हे आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान आहे, असं म्हटलं जातं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीनं तिच्या दिवंगत वडिलांच्या शर्टांपासून एक गोधडी तयार करुन घेतलेली दिसत आहे.
निकिता किनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निकितानं तिच्या दिवंगत वडिलांच्या काही शर्टांपासून गोधडी तयार करुन घेतली आहे. निकितानं दोन गोधड्या तयार करुन घेतल्या आहेत. त्यापैकी एक गोधडी ही तिनं स्वत:साठी तयार करुन घेतली. तर दुसरी ही तिनं तिच्या भावासाठी तयार केली. या गोधडीमुळे वडिलांच्या आठवणींना उजाळा देता येईल, असं निकिताचं मत आहे.
निकितानं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा व्हिडीओ तयार करायला मला दोन वर्ष लागले.' तसेच कॅप्शनमध्ये निकितानं तिच्या वडिलांबाबत देखील सांगितलं. 'फादर्स-डे'ला म्हणजेच 19 जून रोजी निकितानं हा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ शेअर करुन निकितानं सर्वांना फादर्स-डेच्या शुभेच्छा दिल्या.
पहा व्हिडीओ:
View this post on Instagram
निकितानं शेअर केलेला हा व्हिडीओ आठ मिलियन पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर सारा जेन डायस या युझरनं, 'this made me melt',अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. याआधी निकितानं एका पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं होतं की, हिमालय भागातील काही महिलांनी तिला ही गोधडी तयार करुन दिली.
हेही वाचा: