एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हवामान खात्याच्या मान्सून अंदाजाकडे बळीराजाचं लक्ष
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवामानाचा पहिला अंदाज वर्तवला जातो.
मुंबई : भारतीय हवामान खातं आज मान्सूनचा अंदाज जाहीर करणार आहे. दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा नाना अडथळ्यांमधून बळीराजा गेल्या काही वर्षांमध्ये जात आहे. त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस पडून, दिलासा मिळेल का, असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर होणाऱ्या मान्सून अंदाजाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुष्काळाची एक टक्काही शक्यता नसल्याचे स्कायमेटने सांगितले आहे. त्यामुळे स्कायमेटने बळीराजाला दिलासा दिला आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवामानाचा पहिला अंदाज वर्तवला जातो.
स्कायमेटचा अंदाज काय?
यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल.
विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या महिन्यात किती पाऊस? (स्कायमेटच्या अंदाजानुसार)
- जूनमध्ये 111 टक्के पाऊस
- जुलैमध्ये 97 टक्के पाऊस
- ऑगस्ट 96 टक्के पाऊस
- सप्टेंबर 101 टक्के पाऊस
सरासरी पाऊस म्हणजे किती?
890 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.
2017 मध्ये 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.
2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.
महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजाची तुलना : स्कायमेट आणि आयएमडी (आकडे मिलीमीटरमध्ये)
संबंधित बातम्या :
अकोला सर्वात 'हॉट', देशातील उच्चांकी तापमान
यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement