Virar News : विरारमध्ये 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवलं जीवन, कर्जामुळं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता
विरारमध्ये (Virar) एका 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे.
![Virar News : विरारमध्ये 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवलं जीवन, कर्जामुळं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता Virar News A 27 year old youth commits suicide at his residence in Virar Virar News : विरारमध्ये 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवलं जीवन, कर्जामुळं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/c53b8c80a8b6c44edfa4026f3a4ff2771693312867954539_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virar News : विरारमध्ये (Virar) एका 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. विरार पूर्व विवा जाहागीड कॉम्प्लेक्स ओम वरदलक्ष्मी सोसायटीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावरील चार नंबरच्या रुममध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुरेश कर्नाकांती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो दुचाकी वाहनांचा मेकॅनिक होता.
कर्जामुळं आत्महत्या केल्याची शक्यता
सुरेश कर्नाकांती या तरुणाने बाथरुममध्ये जाऊन आपल्या डाव्या हाताची नस कापून बेडरुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. सुरेशला कर्ज झालं होतं आणि त्याच कर्जाच्या डिप्रेशनमध्ये येऊन त्याने हे पाऊल उचललं असाव असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आहेत. हा घरात वयानं सर्वात लहान होता. दरम्यान, विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह तब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
विरार पोलिसांचा तपास सुरु
दरम्यान, विरार पोलिसांच्या तपासानंतरच सुरेशने आत्महत्या का केली. त्याच्यावर कशाचं कर्ज होत हे समोर येणार आहे. मात्र, एका तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)