(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काही दिवसात फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री, भाजपच्या माजी आमदाराचा दावा
Maharashtra Political Crisis : राज्यात शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्ष टोकाला पोहचला आहे. भाजपकडून देखील आता शिंदे गटाला सोबत घेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचे बोललं जातेय.
Maharashtra Political Crisis : राज्यात शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्ष टोकाला पोहचला आहे. भाजपकडून देखील आता शिंदे गटाला सोबत घेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचे बोललं जातेय. त्यातच आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याची उघडपणे चर्चा सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत करोना काळात दोन वर्षे आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्याना सेवेतून कमी करत पालिका प्रशासनाने दुसऱ्या संस्थेमार्फत कर्मचारी भरती केली आहे. याविरोधात या कर्मचार्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषण कर्त्याची माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी काही दिवसातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील किंवा त्यांना महत्वाचं खातं मिळेल. फडणवीस मुख्यमंत्री होताच कल्याणातील सर्वात प्रथम आरोग्य कर्मचार्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर त्याबदल्यात भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातच आज कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला बाहेर साखळी उपोषणाला बसलेले आरोग्य कर्मचारी च्या आंदोलनात भाजपचे माजी आमदार सहभागी झाले. यावेळी तुमच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन देताना त्यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील यानंतर सर्वात प्रथम आपण हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार असून या कर्मचार्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ऑपरेशन लोटस जवळपास पूर्ण झालं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.