एक्स्प्लोर

हायवेवर बंद पडली रुग्णवाहिका, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा आला अन्...; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय

CM Eknath Shinde: रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि रुग्णाची मदत केली.

Maharashtra Thane News Updates : ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा संवेदनशीलपणा आपण यापूर्वीही अनेक घटनांमध्ये पाहिला आहे. आता याच संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुख्यमंत्री शिंदे गडचिरोली (Gadchiroli News) येथील नियोजित दौरा आटोपून ठाण्यातील (Thane News) निवासस्थानी परतत होते. पण वाटेतच मुख्यमंत्र्यांना एक रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडलेल्या अवस्थेत दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली. मुख्यमंत्र्यांना तातडीनं ताफा थांबवला आणि स्वतः चौकशी केली. 

रुग्णवाहिकेत रुग्ण असून त्याला तातडीनं उपचारासाठी नाशिकहून मुंबईला आणण्यात आल्याची माहिती मिळाली. रुग्णाचं नाव धर्मा सोनवणे, पण मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला असल्यामुळे रुग्णाला पुन्हा नाशिकला नेलं जात असल्याचं नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.  

पाहा व्हिडीओ : Eknath Shinde Helps Ambulance : हायवेवर दिसली बंद पडलेली रुग्णवाहिका; एकनाथ शिंदेंची थांबवला ताफा

मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना फोन लावला. रुग्णाची माहिती देत, तात्काळ रुग्णाला दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरू करण्यास सांगितलं. धर्मा सोनावणे यांचा अपघात झाला होता, त्यातच त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या प्रमुखांच्या मदतीनं सर्वोतोपरी मदत पुरवण्यात आली आणि तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. एवढंच नाहीतर, धर्मा सोनावणे यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेनं मदत केलेली पाहुन धर्मा सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

दरम्यान, गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी (8 जुलै) रोजी गडचिरोलीतील पहिल्याच जाहीर कर्यक्रमात  सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिघांची एकत्रित शक्ती भविष्यात राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात गडचिरोलीतील ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Embed widget