एक्स्प्लोर

Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Election Survey Result: टाईम्स नाऊ नवभारतनं एक सर्वेक्षण केलं आहे. आज लोकसभेची निवडणूक झाली, तर कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या सर्वेक्षणात केला आहे.

Maharashtra Election News: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra NCP Political Crisis) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) भूकंपानंतर आता जवळपास सर्वच समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabah Election 2024) झाली तर निकाल काय लागतील आणि जनतेचा कौल कोणाला मिळेल? हे प्रश्न आतापासूनच सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहेत.

देशात लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी 2024 मध्ये होणार असल्या तरी, महाराष्ट्रात अद्याप निवडणुकीचे बिगुल वाजलेले नाही. टाईम्स नाऊ नवभारतनं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एक सर्वेक्षण केलं आहे. आज लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) झाली तर कोणत्या पक्षाला किती मताधिक्य मिळेल? हा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. दरम्यान, या सर्वेक्षणाचे आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. 

कोणत्या पक्षाला किती मतं?

सर्वेक्षणानुसार, आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या (BJP) पारड्यात जरा जास्त मताधिक्य पडले. सर्वेक्षणात भाजपला 43.10 टक्के तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) 42.10 टक्के मतं मिळाली आहेत. इतरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची मतांची टक्केवारी 14.80 टक्के आहे. महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपचं मताधिक्य पुढे असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे, परंतु संख्याबळ पाहता महाविकास आघाडी भाजपच्या तुलनेत फारशी मागे नाही. महाविकास आघाडीच्या मतांचा वाटा भाजपपेक्षा फक्त एक टक्का कमी आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं? 

भाजपची मतांची टक्केवारी : 43.10 टक्के
महाविकास आघाडीची मते : 42.10 टक्के
इतरांच्या मतांचा वाटा : 14.80 टक्के

निवडणुकीपूर्वी नेतेमंडळी सज्ज 

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं प्रादेशिक युनिट्सची एक मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू केली आहे, ज्याकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. संघटनात्मक बदलांमध्ये तेलंगणा, पंजाब आणि झारखंडचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, सुनील जाखर आणि बाबुलाल मरांडी यांची नावं समाविष्ट आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय होतं चित्र? 

भाजपची लाट देशातील काही राज्यांतून ओसरताना दिसत आहे. यावेळी बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं. ही तिनही तिच राज्य आहेत, जिथे 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकतर्फी विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजप, एलजेपी आणि जेडीयूनं बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. परंतु, आता जेडीयूननं भाजपची साथ सोडली आणि भाजपनं बिहारमधील सत्ता गमावली. कर्नाटकात 28 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या, तर एक जागा त्यांच्या समर्थक उमेदवारांच्या वाट्याला गेली, परंतु कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mararashtra NCP Crisis: 2024 मध्ये भाजपला का हवीये अजित पवारांची साथ? काय आहे निवडणुकीपूर्वीचा गेम प्लान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget