एक्स्प्लोर

Konkan MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीची शनिवारी सोडत

Konkan MHADA Lottery 2024 : ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात सकाळी 10.00 वाजता संगणकीय सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते पार पडणार आहे.  

Konkan MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या (Konkan MHADA) 5311 घरांच्या लॉटरीची शनिवारी (दि.24) सोडत होणार आहे.  ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात सकाळी 10.00 वाजता संगणकीय सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते पार पडणार आहे.  

5311 सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त 25,078 पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहात आयोजित सोडत कार्यक्रमामध्ये 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त 25,078 पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत सकाळी १०.०० वाजता जाहीर होणार आहे. या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

कोंकण मंडळातर्फे सोडत कार्यक्रमाचे सुटसुटीत नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर

वेब कास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जसोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे. "संगणकीय सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी सोडत कार्यक्रमात सहभाग घ्यावा",  असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मारोती मोरे यांनी केले 
 
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. 

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2278 सदनिका आहेत. प्रथम येणार्यामस प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता 20 टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 5311 सदनिकांपैकी 2278 सदनिका प्रथम येणार्यापस प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत असल्याने ३०३३ सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. याप्रसंगाचे औचित्य साधत प्रथम येणार्यासस प्रथम प्राधान्य या योजनेतील प्रथम 5 लाभार्थ्यांना प्रातीनिधिक स्वरुपात तात्पुरत्या देकार पत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती

सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) च्या माध्यमातून होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. 

ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती. या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण 31,871 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 25,078 अर्ज प्राप्त झाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

मुंबईतील 19 स्थानके होणार अद्यावत, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पंतप्रधान करणार कामाच्या शुभारंभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget