Kalyan News : राजकीय देखाव्यावर पोलिसांची कारवाई, कारवाई विरोधात मंडळाची न्यायालयात धाव
Kalyan News : कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने शिवसेना बंडखोरीवर चलचित्र देखावा सादर करण्यात आला होता.
Kalyan News : कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने शिवसेना बंडखोरीवर चलचित्र देखावा सादर करण्यात आला होता. मात्र या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत पहाटेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. मंडळाच्या विश्वस्ताविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर मंडळासह शिवसेनेने देखील आक्रमक झालेत. कारवाईचा निषेध नोंदवत यंदा मंडळांनी गणेश मूर्ती स्थापना केली नाही. पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज मंडळाच्या मंडपात शिवसेना व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरतीचा आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीमध्ये शिवसेना पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कल्याणमध्ये विजय तरुण मंडळ आहे. या मंडळाचे हे गणेशोत्सवाचे यंदाचे 59 वे वर्ष आहे. दरवर्षी वर्षाभरातील घडामोडींवर मंडळाकडून चलचित्र देखावे साकारले जातात. यंदाची मोठी घडामोड म्हणजे शिवसेनेत झालेली बंडखोरी. या विषयावर यंदा मंडळाकडून देखावा सादर करण्यात आला .हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण पोलिसांनी या देखाव्यांवर आक्षेप घेत देखाव्याचे सामान जप्त करत कारवाई करण्यात आली. मंडळांच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाई निषेधार्थ शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करन्यात आली आहे. मंडळाचे विश्वस्त व शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी कारवाई विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यंदा मंडळाकडून गणेशमूर्तीची स्थापना देखील करण्यात आली नाही. या कारवाई विरोधात शिवसेना शहर शाखा व मंडळाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाळा हरदास ,महानगर प्रमुख विजय साळवी ,शहर प्रमुख सचिन बासरे,शरद पाटील ,पदाधिकारी धनंजय बोडारे सामील झाले होते. यावेळी विजय साळवी यांनी 59 वर्ष जुनं मंडळ असताना पोलिसांच्या फौज फाटा घेत रात्री कारवाई करत करण्यात आली. या कारवाई निषेधार्थ या मंडळात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होते. या आरतीच्या माध्यमातून उद्या जी याचिका दाखल केली, त्या याचिकेत आमच्या बाजूने कौल लागेल आणि तो लागणारच आहे. घटनेने आम्हाला अधिकार दिले ते अधिकार हिरावून घेतले तर ब्रिटिशांनी आपल्यात काही फरक राहणार नाही ,हे सरकार जेवढी पापं करेल तेवढे त्यांच्या पापाचा घडा भरणार हे निश्चित असं सांगितलं.
आणखी वाचा :
Kalyan News : ...म्हणून कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या चलचित्र देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई