IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
One Mobikwik Systems : वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा मिळाला.
मुंबई : फिनटेक कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ आज शेअर बाजारात एनएसई आणि बीएसईवर लिस्ट झाला. मोबिक्विकसह विशाल मेगा मार्ट आणि साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट झाले. या तीन आयपीओमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना चांगला परतावा मिळाला. बीएसईवर वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ 59 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. तर, एनएसईवर 61 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला.
वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओचा किंमतपट्टा 279 रुपये निश्चित करण्यात आला होता. मात्र, आयपीओ लिस्ट होताना 442.25 रुपयांना लिस्ट झाला त्यामुळं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स मिळाले. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आणखी 19 टक्के वाढ झाली. मोबिक्विकच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं असून आज शेअर 528 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना प्रतिशेअर 249 रुपयांचा फायदा झाला आहे. या टक्केवारीनुसार गुंतवणूकदारांना 89.25 टक्के फायदा झाला.
एनएसईच्या आकडेवारीनुसार वन मोबिक्विक सिस्टीम्सनं 572 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी 1,18,71,696 शेअरची विक्री करण्याचा निर्णय घेतला. रिटेल गुंतवणूकदारंनी हा आयपीओ 134.67 पट सबस्क्राइब केला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 119.50 पट सबस्क्राइब केलं. याशिवाय 108.95 पट सबस्क्राइब केला होता.
मोबिक्विक या फिनटेक कंपनीनं अँकर इन्वेस्टर्सद्वारे 257 कोटी रुपये जमवले होते. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 265-279 रुपये ठेवला होता. वन मोबिक्विक सिस्टीम्सनं सर्व शेअर नव्यानं जारी केले होते.
वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या व्यवस्थापनानं 150 कोटी रुपयांचा वापर आर्थिक सेवा उद्योगातील व्यवसाय वृद्धीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 135 कोटी रुपये पेमेंट सर्व्हिसेस व्यवसायात वापरले जातील. 107 कोटी डाटा, एआय आणि प्रॉडक्ट अँड टेक्नोलॉजी मध्ये रिसर्च अँड इन्वेस्टमध्ये वापरले जातील. 70 कोटी पेमेंट डिवाइस व्यवसायात वापरले जाणार आहेत.
वन मोबिक्विक सिस्टीम्स ही गुरुग्राम येथील कंपनी आहे. या कंपनीनं जुलै 2021 मध्ये आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाजारात त्यावेळी प्रतिकूल स्थिती असल्यानं त्यांनी आयपीओ मागं घेतला होता.
विशाल मेगा मार्टचे गुंतवणूकदारही मालामाल
विशाल मेगा मार्टनं 8 हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या कंपनीचा आयपीओ 104 रुपयांना लिस्ट झाला. या आयपीओचा किंमतपट्टा 78 रुपये निश्चित करण्यात आला होता. इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये 114 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
इतर बातम्या :