Maratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक
Maratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक
तुळजापुरात गुणरत्न सदावर्ते याच्या विरोधात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सदावर्ते जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी अबीर फेकण्याचा प्रयत्न सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुण रत्न सदावर्ते करत असल्याचा केला आरोप तुळजाभवानीचे दर्शन व एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते आले आहे तुळजापुरात
हे ही वाचा..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला. पात्रता असताना देखील डावले गेलं, डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची करणे असतील. मला मंत्री पद का नाकारले मला माहित नाही, पण ठीक हे आहे कुटुंबातील प्रश्न आहे. तो आम्ही बघू मात्र मी नाराज झालो होतो. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होता, तसा झाला त्यामुळे मी अस्वस्थ होतो. कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षा भंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झालं नाही. मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते. अशी आगपाखड करत मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेल्या शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी तिखट भाषेत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.