ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
नाशिकमध्ये समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळांची पक्षाध्यक्ष अजित पवारांवर थेट तोफ...पटेल, तटकरेंसह मुख्यमंत्री फडणवीसांनीही केले मंत्रिपदासाठीचे प्रयत्न...मात्र अजितदादांनी बैठक घेतलीच नसल्याचा भुजबळांचा गौप्यस्फोट...
मंत्रिपदाची हाव असती तर १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला असता, मात्र प्रश्न अस्मितेचा आहे, समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य
बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या वक्तव्याप्रकरणी अमित शाहांनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी... आंबेडकरांऐवजी काँग्रेसने देवाचं नाव घेतलं असतं तर सात पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या, असं शाहांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाहांच्या समर्थनासाठी मैदानात, शाहांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला असा दावा, काँग्रेसनं आंबेडकरांच्या केलेल्या अपमानांची वाचली यादी
आंबेडकरविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शाहांवर भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल, भाजपची मनू विकृती समोर आली अशी टीका..