Kalayan News: भाजप आमदाराच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट, पोलीसांनी तरुणाला घेतले ताब्यात
Kalayan News: भाजप आमदारांच्या नाव्याने फेक फेसबुक अकाऊंट बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Kalayan News: भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन महिलांना मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना 'तुम्ही आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे का?' असे विचारले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या चंदन शिर्सेकर या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन केलाय याचा तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत. तसेच या प्रकरणातील सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
काही दिवसापूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजा ऐवजी कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना काही दिवसापूर्वी त्यांच्या नावाने फेसबुकवर फेक आकाऊंट तयार आले आहे. त्याद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जात आहे. त्यामध्ये हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का असे मेसेजही पाठवण्यात येत होते. त्यापैकी काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना त्यांना याबद्दल विचारणा केली. हे ऐकून गायकवाड हे काहीशा संभ्रमात पडले.
त्यांनी कोणालाही फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली नसताना देखील अशी विचारणा त्यांना कशी झाली हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा कोणीतरी त्यांचे बनावट फेसबुक अकाउंट काढल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी यासंदर्भात तात्काळ पोलिसांत तक्रार केली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चंदन सुभाष शिर्सेकर या 28 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.
चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहणारा आहे. चंदन फक्त दहावी शिकला आहे. विशेष म्हणजे तो पकडला जाऊ नये यासाठी दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉटचा वापर करीत होता. पण त्याने हे कोणाच्या सांगण्यावरुन केले याचा तपास सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
हे ही वाचा :
Nashik Crime : इगतपुरीतून अल्पवयीन फूस लावून मुलीला पळवलं, जळगावात विकून लग्न लावलं, संशयितास अटक