Dombivli : पलावा पुलाचे उद्धाटन, पुन्हा तीन दिवसात डागडुजी करावी लागली; डोंबिवलीत ठाकरे-मनसे आणि शिंदे सेनेत जुंपली
Dombivli Palava Bridge : अर्धवट काम झाले असतानाही पुलाचे उदघाटन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर आणि नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेने आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.

ठाणे : तीन दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि मनसे-ठाकरे गट आमने-सामने उभे ठाकलेत. हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला. तर या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा अशी मागमी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली. तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपक म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत या अर्धवट पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांसह पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.
मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका केली. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं. सत्ताधारी हे ठेकेदाराला काही बोलत नाहीत. ते खाल्ल्या मिठाला जागतात असा आरोप केला. या पुलावर अपघातामुळे लोकांचे बळी जातील, त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून मगच पूल सूरु करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली .
परवा दि.४ जुलै रोजी लोकार्पण झालेला आमचा पलावा पुल ! #भ्रष्टाचार #पलावा #Palava #कल्याण_शीळ_रस्ता #KalyanShilRoad #MMRDA pic.twitter.com/9quUzKdbG6
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 6, 2025
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पुलावर डांबर आणि ऑइल असल्याने बाईक स्लिप होत होत्या. त्यामुळे स्टोन क्रशर टाकला आहे. या स्टोन क्रेशरचे फोटो टाकून विरोधक टीका करतात. 5 जुलैपासून हा पुल सुरू झाला असून आतापर्यंत एकही अपघात झाला नाही. विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार."
उद्धाटनाच्या दोन दिवसात डागडुजी करावी लागली
अनेक महिन्यांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पुलावरील रस्त्याचा काही भाग गुळगुळीत असल्याने दोन दुचाकीस्वार पडून अपघात झाला. त्यानंतर काही क्षणात पुन्हा पूल बंद करत युद्धपातळीवर या पुलावरील रस्त्याचे डागडुजीचे काम हाती घेण्यात आले.
तासाभराने पुन्हा पूल सूरु करण्यात आला. मात्र त्यानंतर पुलावरील रस्त्याची केलेली तात्पुरती डागडुजी टीकेचा विषय ठरली. या पुलावर दुचाकीस्वाराना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत ठाकरे गटासह आक्रमक मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय .
ही बातमी वाचा:























