एक्स्प्लोर

Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनीच्या मालकाला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी

Dombivli MIDC Blast : ही घटना नैसर्गिक असून उष्णता वाढल्याने हा स्फोट झाल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यांनी या प्रकरणात राजस्थानच्या एका खटल्याचा संदर्भही दिला.

ठाणे : डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणात (Dombivli MIDC Blast) कंपनीच्या मालकाला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करायचा असून आरोपीला सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण 

अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणाचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. 

मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला 29 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती. आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. 

कल्याण न्यायालयाच्या सर न्यायाधीश श्रीमती   एस एस राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील पी. सकपाळ यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रिअॅक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे या अशा अनेक बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिंलाकडून आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला 304 ए कलम लागू होत नसल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून  कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता असे आरोपीचे वकील सम्राट ठक्कर यांनी सांगितले.  

ही नैसर्गिक घटना असून, तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केला. तर कंपनीच्या को डायरेक्टर असलेल्या स्नेहा मेहता यांचा कंपनीशी डायरेक्ट काही संबंध नाही. त्यांची सही देखील कंपनीमध्ये चालत नाही. त्या कॉमर्स बॅकग्राऊंडच्या असल्याने केमिकल संदर्भात त्यांना माहित नाही. त्यांची आजारी सासू आणि त्यांची दोन मुले त्यांची वाट बघत असल्याचा युक्तिवाद देखील सम्राट ठक्कर यांनी केला.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Thane Assault Case : ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
Thane : परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण, मनसे आक्रमक; अविनाश जाधवांनी ठाण्यातील मुजोर ओला-उबेर चालकांना चांगलंच चोपलं
परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण, मनसे आक्रमक; अविनाश जाधवांनी ठाण्यातील मुजोर ओला-उबेर चालकांना चांगलंच चोपलं
Thane News : वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
Dadar Best Bus Accident : डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!

व्हिडीओ

Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget