एक्स्प्लोर

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, इमारतींच्या काचा फुटल्या

Dombivli news: एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते. या स्फोटाचे हादरे दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात बसले. इमारतींच्या काचा फुटल्या.

ठाणे: डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून (Dombivli MIDC) लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जात आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते. 

प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अमुदान या कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. 

याठिकाणी अजूनही स्फोट सुरु असल्याचेही समजते. त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे. 

एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या कामगाराची प्रतिक्रिया

या भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने एबीपी माझाशी संवाद साधला. त्याने सांगितली की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असे कामगाराने सांगितले.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार,  मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही. अजूनही याठिकाणी स्फोट सुरु आहेत.

बॉयलर्सचे तुकडे दीड किलोमीटर अंतरावर पडलेत, सगळ्या सोसायट्यांमधील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत: स्थानिक प्रत्यदर्शीची माहिती

या कंपनीत स्फोट एक-सव्वाच्या आसपास झाला. या स्फोटामुळे दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत, मोठी मनुष्यहानी झाली असावी. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.  

कंपनीतील केमिकल ड्रम्सच्या साठ्यामुळे स्फोटांची मालिका, अग्निशमन दलाला आत शिरता आलेले नाही: माजी नगरसेवक मंदार हळबे

आता थोड्यावेळापूर्वी स्फोट झाला आहे. लांबच्या अंतरापर्यंत धूर पसरला आहे. आम्ही साधारण 20-25 जखमी लोकांना धावताना पाहिले आहे. अजूनही कंपनीत ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. कंपनीतून सध्या धुराचे प्रचंड लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आतमध्ये जाणे शक्य होत नसल्याचे मंदार हळबे यांनी सांगितले. 

सात वर्षांपूर्वीच्या स्फोटाच्या भीषण आठवणी जाग्या

डोंबिवली एमआयडीसी भाग ही रहिवासी परिसराला लागून आहे. केमिकल कंपन्या असलेल्या भागातच नागरी वस्तीही आसपास आहे. या कारणामुळे स्फोट आणि आगीच्या घटनेचे परिणाम वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळीही एकामागून एक स्फोट झाल्याने घटनेची तीव्रता वाढली होती.

डोंबिवलीतील पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटानं पुरता हादरुन गेला होता. या स्फोटात तब्बल 12 जण दगावले होते. तर, तब्बल 183 जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीत झालेला हा केमिकल स्फोट इतका शक्तिशाली होता की, कंपनीची इमारत जमीनदोस्त झाली होती. ज्याठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी 10 फुटांचा खोल खड्डा पडला होता. याव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर कंपन्यांच्या इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

स्फोटामुळे 25 ते 30 जण जखमी, मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी की, आजुबाजूच्या रहिवासी इमारतींमधील काचा फुटल्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जखमी झालेल्या 25 ते 30 जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

आग आणखी भडकली, आजुबाजूच्या कंपन्यांमधील केमिकल साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास धोका

आग आजुबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. अन्य कंपन्यांमध्येही केमिकलचा मोठा साठा आहे. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर आगीची आणि स्फोटांची तीव्रता कैकपटीने वाढू शकते. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील सर्व अग्निशमन केंद्रातील गाड्या डोंबिवली एमआयडीसी परिसरात बोलावून घेण्यात आले आहे. 

डोंबिवली MIDC स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

डोंबिवलीतील एमआयडीसी स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, घटनास्थळी रेस्क्यू टीम, जिल्हाधिकारी आणि खासदार पोहोचले आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. माझ्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून लांबच्या अंतरावरून पाण्याचा मारा

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीची तीव्रता इतकी जास्त आहे की, अग्निशमन दलाच्या जवानांना कंपनीच्या गेटवरुनच पाण्याचा मारा करावा लागत आहे. कंपनीत अजूनही रसायनांचे अनेक ड्रम आहेत. आगीमुळे या ड्रमचा स्फोट होत आहे. त्यामुळे आग कमी होताना दिसत नाही. आगीची धग कमी झाल्याशिवाय अग्निशमन दलाला आतमध्ये शिरता येणे शक्य नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget