कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना एकनाथ शिंद म्हणाले की, कमिटी स्थापन करण्यासाठी तुमची कागदपत्रे हवी हे सांगून आम्ही त्यांची डाक्युमेंट घेतली होती.
Eknath Shinde : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या होत्या. यासाठी भाजपकडून 4, शिवसेना शिंदे गटाकडून 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून 1 अशा सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. यामुळं शिवसेना शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना एकनाथ शिंद म्हणाले की, कमिटी स्थापन करण्यासाठी तुमची कागदपत्रे हवी हे सांगून आम्ही त्यांची डाक्युमेंट घेतली होती. त्यानंतर त्यांना सांगितले की राज्यसभेसाठी आपण तुमचा अर्ज भरणार आहोत. सर्वसामान्य महिलांना आपण स्थान दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्यावर आमचं लक्ष असतं असंही ते म्हणाले.
आईची तगमग आणि बायकोची काटकसर बघीतली म्हणून लाडकी बहिण योजना सुरु केली
माझ्या वडीलांची तब्येत बरी नाही म्हणून मी येणार नव्हतो पण हा लाडका भाऊ बहिणीच्या प्रेमापासून वंचित रहायला नको म्हणून मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुकीत आपण वार नाही तलवार आहे, ही शमशेरीची धार आहे हे सगळ्यांना दाखवलं. मी आईची तगमग आणि बायकोची काटकसर बघीतली म्हणून लाडकी बहिण योजना सुरू केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला खासदार केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही माझी मोठी ओळख
बचत गटांच्या माध्यमातून स्त्री सक्षम केल, विविध फुड ट्रक सुरु केले. सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही माझी मोठी ओळख असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. माझी आई वारली ही बातमी समजली तरी मी राजेंद्र गावित यांच्या भागात पाच ते सहा सभा घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
गेल्या काही काळापासून ज्योती वाघमारे या आक्रमकपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडतायेत
गेल्या काही काळापासून ज्योती वाघमारे या आक्रमकपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडत आल्या आहेत. ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक घणाघाती टीकेला ज्योती वाघमारे यांनी तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, तरीही ज्योती वाघमारे या शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत ज्योती वाघमारे नवख्या असल्याने त्यांना राज्यसभेसाठी संधी मिळेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
महत्वाच्या बातम्या:
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
महत्त्वाच्या बातम्या





















