एक्स्प्लोर

कंपनीच्या गेटवर काळ्या धुराचे प्रचंड लोट, फायर ब्रिगेडला आत शिरता येईना, केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट

डोंबिवलीतल आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून आमदार, खासदारही डोंबिवली एमआयडीसीकडे निघाले आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील महत्त्वाची आणि मोठी एमआयडीसी अससेल्लया डोंबिवली (Dombivali) एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या स्फोटानंतर आगीचे व धुराचे लोट संपूर्ण डोंबवली परिसरात पसरल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 2 ते 3 किमी दूरपर्यंत या स्फोटाची (Dombivali blast) तीव्रता जाणवली असून डोंबिवली परिसरातील रहिवाशी आणि शॉपिंग सेंटरच्या काच्या फुटल्याचेही दिसून आले. या दुर्घटनेत 20 ते 25 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना तत्काळ जवळी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर, अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, कंपनीच्या गेट परिसरातच काळ्या धुराचे प्रचंड लोट असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवण्यासाठी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती.  

डोंबिवलीतल आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून आमदार, खासदारही डोंबिवली एमआयडीसीकडे निघाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांनीही घटनास्थळी पाचारण केले. मात्र, कंपनीतील स्फोट भीषण असल्याने धुराचे आणि आगीचे लोट मोठ्या प्रमाणात कंपनी परिसरात उसळल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अग्निशमन दलाच्या जवानांना कंपनीच्या मेन गेटमधून आत जाण्यासही अडथळ निर्माण झाला होता. 

फेज 2 मध्ये भीषण स्फोट

मे.अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनीजवळ, एम.आय.डी.सी. फेज-02, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व). या ठिकाणी डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी 5 ते 6 कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने सदर घटनास्थळी स्फोटामुळे अनेक वाहनांचे व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. स्फोट इतका मोठा होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. मात्र, परिसरात सगळे आगीचे लोळ येत होते. त्यामध्ये, आमच्या हाताला भाजले आहे, असे एका प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितले. तर, काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार,  मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. 

परिसरात आगाऊ गाड्या मागवल्या 

अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे शक्य झाले नव्हते. आगीचे व धुराचे प्रचंड लोट असल्याने अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचूनही त्यांना गेटवरच थांबावे लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे आगीची तीव्रता मोठी असल्याने अंबरनाथ, कल्याण व परिसरातील इतर ठिकाणाहूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या आहेत. 

परिसरातील सगळ्याच काचा फुटल्या

या कंपनीत स्फोट एक-सव्वाच्या आसपास झाला. या स्फोटामुळे दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत, मोठी मनुष्यहानी झाली असावी. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="mr" dir="ltr">डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत झालेला स्फोट ही अतिशय गंभीर बाब आहे. या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांना यश यावे, अशी प्रार्थना !<br><br>अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या…</p>&mdash; Ravindra Chavan (Modi Ka Parivar) (@RaviDadaChavan) <a href="https://twitter.com/RaviDadaChavan/status/1793567340061413745?ref_src=twsrc%5Etfw" rel='nofollow'>May 23, 2024</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

सदर घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहने पुढीलप्रमाणे:-

१) एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
२) डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
३) कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
४) कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
५) पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
६) ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत.

दरम्यान, सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळविण्याचे  शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अडथळ्यांना पार परत जवानांकडून आग आटोक्यात आणली जात आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget