Dombivali Accident : बॉल झेलण्यासाठी गेल्याप्रमाणे धावला, क्रिकेट खेळण्याचा अनुभव कामी आला, तिसऱ्या मजल्यावरुन कोसळलेल्या बाळाला वाचवलं Video
Dombivali Accident : बॉल झेलण्यासाठी गेल्याप्रमाणे धावला, क्रिकेट खेळण्याचा अनुभव कामी आला, तिसऱ्या मजल्यावरुन कोसळलेल्या बाळाला वाचवलं Video
Dombivali Accident : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, हे बाळ हवेत असतानाच त्याचा झेलण्यासाठी एक व्यक्ती धावला. त्याने क्रिकेटचा चेंडू झेलतो त्याप्रमाणे बाळाला पकडण्यासाठी धावला आणि बाळाला वाचवले.
View this post on Instagram
चेंडूला पकडण्यासाठी गेल्याप्रमाणे दोन वर्षाच्या मुलाचा कॅच घेण्याचा प्रयत्न
डोंबिवलीतील एका घराचे काम सुरू असल्याने ग्रीलला असलेल्या काचा कलरिंग कामासाठी काढण्यात आल्या होत्या आणि त्याच वेळी हा दोन वर्षाचा मुलगा खेळता खेळता गॅलरीमध्ये गेला आणि तो ग्रीलमधून खाली पडला. त्याचवेळी काही कामानिमित्त भावेश मात्रे हे त्या इमारतीमध्ये आले होते. महिलांचा आवाज जोरजोरात येत असल्याने भावेश यांची नजर त्या आवाजाकडे गेली आणि लागलीच भावेशला तो मुलगा खिडकीवरून खाली पडत असल्याचे दिसले. त्याने भावेशने चेंडूला पकडण्यासाठी गेल्याप्रमाणे धाव घेत या दोन वर्षाच्या मुलाचा कॅच घेण्याचा प्रयत्न केला. हातामधून हे बाळ त्याच्या हातातून निसटले आणि पायावर पडले. यामध्ये या घटनेत बाळाचा हात फॅक्चर झालाय. सध्या या बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती बाळाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
View this post on Instagram
भावेशचा क्रिकेटच्या टूर्नामेंटमध्ये सहभाग, अनेक पारितोषिके मिळवली
प्रत्यक्षदर्शी भावेश एकनाथ म्हात्रे हे डोंबिवली पश्चिम येथे राहतात. भावेश हे उत्तम क्रिकेटचे खेळाडू आहेत. त्यांनी भिवंडी कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे, रायगड या परिसरामध्ये क्रिकेटच्या टूर्नामेंटमध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवले आहेत. या चित्त थरारक घटनेबाबत भावेश म्हणाला की, क्रिकेटचा अनुभव असल्यामुळे त्यांना या बाळाला वाचवता आल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे. ज्यावेळी मुलगा कोसळत होता त्यांना हा मुलगा चेंडूप्रमाणे दिसला आणि त्याला मी पकडणार असं त्यांनी मनामध्ये गाठ बांधली. चेंडूला पकडण्यासाठी धावल्याप्रमाणे त्यांनी धाव घेतली आणि बाळाला पकडले. क्रिकेटच्या अनुभवामुळे या बाळाचा कॅच घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला