Anjali Damania : देशमुखांचं पोस्टमॉर्टम केलं, अंबाजोगाईत पियुष हॉटेल, वाल्मिकसाठी नाशिकहून बीडला आणलं? अंजली दमानियांनी सिव्हिल सर्जनची कुंडली मांडली
Anjali Damania on Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचे अंजली दमानिया यांनी सिव्हिल सर्जनवर गंभीर आरोप केले आहेत.
Anjali Damania on Walmik Karad, Beed : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी गेल्या महिनाभरात बीडमधील परिस्थितीवर सातत्याने भाष्य केलंय. पोलीस यंत्रणेपासून हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासाबाबतही अंजली दमानिया यांनी अनेक दावे केले होते. दरम्यान, आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वाल्मिक कराडवर (Walmik Karad) उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जनची कुंडली मांडली आहे. याशिवाय त्यांनी सिव्हिल सर्जन अशोक थोरात (Ashok Thorat) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 26, 2025
मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत.
ह्याची चौकशी व्हायला हवी.
त्यांच्याच खाली
१. संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले
२. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले.… pic.twitter.com/QoMm3QGK5o
अंजली दमानिया कोणते आरोप केले?
हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे ? मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच खाली
1. संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले
2. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले.
३. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले.
4. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिक ला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीड मधे आगमन झाले आहे.
अंजली दमानियांचे अजित पवारांनाही सवाल
अंजली दमानिया म्हणाल्या, अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही? बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे, राजकारणाच्या जीवावर दादागिरी. हा पुरावा बास का आणि पुरावे पाहिजे गुन्हा दाखल करायला ? काय एक्शन घेणार तुम्ही ? तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात आणि बीडचे देखील आहात. तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा.
अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 26, 2025
बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे, राजकारणाच्या जीवावर दादागिरी.
हा पुरावा बास का आणि पुरावे पाहिजे गुन्हा दाखल… pic.twitter.com/rGLZcKE0Qj
इतर महत्त्वाच्या बातम्या