(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi News : साहेब, तुमची खूप आठवण येईल; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Bhiwandi News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी बाहेर येऊन प्रथम पोलीस स्टेशनच्या पायरीवर आपलं डोकं टेकले आणि सर्वांचे आभार मानले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. सहकाऱ्यांनी दिलेल्या निरोपामुळे शीतल राऊत देखील भारावले.
Bhiwandi News : सरकारी अधिकारी म्हटलं की बदली, नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, राबवलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, कार्यशैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक. यासारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन् पुढच्या ठिकाणी रुजू होण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका 'जिगरबाज' पोलीस अधिकाऱ्याला (Police Officer) निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
फुलांचा वर्षाव करुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शुभेच्छाBhi
भिवंडी (Bhiwandi) शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात त्यांच्यासाठी निरोप समारंभ (Send Off) ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली भावना देखील व्यक्त केल्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पोलीस ठाण्याचा चार्ज पोलीस निरीक्षक शंकर इंदुलकर यांना दिला आणि त्यानंतर ते आपल्या घरासाठी निघाले. यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रांगेत उभे राहून शीतल राऊत यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शीतल राऊत यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन प्रथम पोलीस स्टेशनच्या पायरीवर आपलं डोकं टेकले आणि सर्वांचे आभार मानले. मात्र यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. सहकाऱ्यांनी दिलेल्या निरोपामुळे शीतल राऊत देखील भारावले. त्यांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.
आवडत्या अधिकाऱ्याला निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
शेवटची भेट घेत असताना अनेक जण भावूक झाले आणि रडू लागले. साहेब तुमची खूप आठवण येईल, अशी भावना देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी भिवंडी शहरात साडेसहा वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. याआधी साडेचार वर्षे ते गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यानंतर दोन वर्ष त्यांनी भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलं. यावेळी निरोप देताना त्याने आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानले .
VIDEO : Bhiwandi Police : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शrतल राऊत यांची बदली, सहकारी भावूक : ABP Majha
संबंधित बातमी
Trending: एक शिक्षक असाही! रिटायरमेंटनंतर रडलं गाव, हत्तीवरुन वाजतगाजत मिरवणूक