(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Amshya Padvi, Nadurbar : शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्या वर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Amshya Padvi, Nadurbar : नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात जोरदार राडा झालाय. शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपचे कार्यकर्ते असून महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे.
पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याचा आरोप
ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आमदार पाडवी यांच्या मुलाकडून भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलानेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर फिर्याद दिली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी,, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यास पीडित महिला आणि त्यांच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महायुतीमधील दोघी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष आला समोर आलाय. भाजप आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आलाय.
आमश्या पाडवींकडून केसी पाडवींचा पराभव
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांनी विजयश्री खेचून आणली आहे. आमश्या पाडवी यांनी काँग्रेसचे फायरब्रँड नेते केसी पाडवी यांचा 4800 मतांनी पराभव केलाय. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या मतदारसंघात काँग्रेसचे के.सी. पाडवी सात वेळेस विजयी झाले होते. मात्र, या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुरुवातीला के.सी.पाडवी तर कधी डॉ. हिना गावित आघाडीवर होत्या. मात्र, अखेरीस आमश्या पाडवी यांनी विजय मिळवला होता.
- अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद....
- शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्या वर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप....
- आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते
- महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य
- ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याचा रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप...
- आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.....
- आमदार पाडवी यांच्या मुलीनेही भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा केला दाखल
- शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी,, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यास पीडित महिलां आणि त्यांच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.....
- महायुती मधील दोघी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष आला समोर......
इतर महत्त्वाच्या बातम्या