(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Australia Social Media Ban : विधेयकानुसार, जर Xx, TikTok, Facebook आणि Instagram सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती ठेवण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले तर त्यांना 275 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले. या विधेयकाला पक्ष आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. असे विधेयक मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आहे. विधेयकानुसार, जर Xx, TikTok, Facebook आणि Instagram सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती ठेवण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले तर त्यांना 275 कोटी रुपयांपर्यंत ($32.5 दशलक्ष) दंड होऊ शकतो. पालकांच्या संमतीसाठी किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या खात्यांसाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही. कायदा लागू झाल्यानंतर, बंदी कशी अंमलात आणायची यावर काम करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळेल. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या विधेयकाचे समर्थन केले. 25 नोव्हेंबर रोजी संसदेत बोलताना अल्बानीजने सोशल मीडियाला तणाव वाढवणारे साधन, ठग आणि ऑनलाइन गुन्हेगारांचे शस्त्र म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन तरुणांनी फोन सोडून फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस खेळावे अशी त्यांची इच्छा आहे.
ब्रिटीश सरकारही बंदी घालण्याच्या तयारीत
ऑस्ट्रेलियाच्या आघाडीनंतर, ब्रिटिश सरकार 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ब्रिटनचे टेक्नॉलॉजी सेक्रेटरी पीटर काइल यांनी सांगितले की, ऑनलाइन सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ते "काहीही करतील" असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. विशेषतः मुलांसाठी. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा तरुणांवर होणाऱ्या परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही पीटर काइल यांनी सांगितले. सध्या आमच्याकडे याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
सोशल मीडियावरून डीपफेक, डिजिटल अटक
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून डीपफेक, डिजिटल अटक आणि ऑनलाइन फसवणूक यांसारखी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक सल्लाही जारी केला होता. यामध्ये त्यांना डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे पालन करण्यास सांगितले होते.
किमान 11 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भारतीय
रिसर्च फर्म 'रेडसीर'च्या मते, भारतीय वापरकर्ते दररोज सरासरी 7.3 तास त्यांच्या स्मार्टफोनवर नजर ठेवतात. यातील बहुतांश वेळ ते सोशल मीडियावर घालवतात. तर, अमेरिकन वापरकर्त्यांचा सरासरी स्क्रीन वेळ 7.1 तास आहे आणि चीनी वापरकर्त्यांचा 5.3 तास आहे. भारतीय वापरकर्ते सोशल मीडिया ॲप्सचा सर्वाधिक वापर करतात. अमेरिका आणि ब्रिटनमधील एका व्यक्तीची सरासरी 7 सोशल मीडिया खाती आहेत, तर एक भारतीय किमान 11 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या