Trending: एक शिक्षक असाही! रिटायरमेंटनंतर रडलं गाव, हत्तीवरुन वाजतगाजत मिरवणूक
विद्यार्थीच नाही तर समाजातही अशा शिक्षकांना मानाचं स्थान असतं जे शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं जीवन घालवतात. राजस्थानच्या भिलवाडामधील एका शिक्षकाची कहाणी अशीच काहीशी आहे.
Bhilwara Rajsthan Teacher Trending: शिक्षकाचं महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात किती असतं हे खरंतर सांगायची गरज नाही. एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतो. मुलांना शिक्षित करण्यासोबत त्यांना चूक-बरोबर या गोष्टी प्रभावीपणे सांगत आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. म्हणूनच शिक्षकांना ईश्वराच्या बरोबरीचं स्थान समाजात दिलं जातं. केवळ विद्यार्थीच नाही तर समाजातही अशा शिक्षकांना मानाचं स्थान असतं जे शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं जीवन घालवतात. राजस्थानच्या भिलवाडामधील एका शिक्षकाची कहाणी अशीच काहीशी आहे.
या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांची हत्तीवर बसवून वाजत गाजत मिरवणूक काढली शिवाय शिक्षक आता आपल्या शाळेत नसणार या गोष्टीनं अख्खं गाव रडलं. भंवरलाल शर्मा (Bhanwarlal Sharma) असं या शिक्षकाचं नाव आहे.
असा निरोप जो पाहून प्रत्येकजण रडला
शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे अनोखं उदाहरण पाहायला मिळालं भिलवाडा जिल्ह्यातील शाहपुरामधील अरवड गावात. अरवडमध्ये नोकरीच्या शेवटच्या दिवशी शाळेत कार्यरत शिक्षक भंवरलाल शर्मा यांना भन्नाट पद्धतीनं निरोप देण्यात आला. हा निरोप समारंभ पाहून शिक्षकाला अश्रू अनावर झाले तर दुसरीकडे प्रत्येक गावकरी देखील रडत असल्याचे चित्र होते. शिक्षक भंवरलाल शर्मा यांना निरोप देताना त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत गावात ही मिरवणूक काढली तसेच त्यांच्या नावाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. सोशल मीडियावर त्यांच्या निरोपाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे.
भंवरलाल शर्मा 20 वर्षांपासून कार्यरत
शिक्षक भंवरलाल शर्मा हे अरवडच्या सरकारी शाळेत मागील 20 वर्षांपासून आपली सेवा देत होते. मागील 8 महिन्यांपूर्वी त्यांची बदली दुसऱ्या शाळेत झाली होती. मात्र तरीही ते रोज अरवडमधील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना भेटायचे. गावातील विद्यार्थी आणि लोकांमध्ये भंवरलाल शर्मा यांच्याविषयी अपार प्रेम आहे. त्यामुळं अशा अनोख्या निरोपाचं आयोजन गावकऱ्यांनी केलं.
गाव आणि परिसरात आयकॉन म्हणून ओळख
भंवरलाल शर्मा हे गाव आणि परिसरात आयकॉन म्हणून ओळखले जातात. त्यांनी रिटायरमेंटनंतर स्वत:च्या पगारातून विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर देण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या निरोपाच्या दिवशी कवी संमेलनाचं देखील आयोजन केलं होतं. या सर्व सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी जमा केली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI