एक्स्प्लोर

Year ender 2017 : वर्षभरात व्हॉट्सअॅप केवढं बदललं? 

2017 हे वर्ष खरं तर बदलांचं वर्ष म्हणता येईल. आर्थिक, राजकीय, सामाजिक असे अनेक बदल या वर्षात पाहायला मिळाले. यासोबतच तंत्रज्ञानामध्येही अनेक मोठे बदल झाले. आजचा जमाना खरं तर सोशल मीडियाचा आहे. त्यामध्येही व्हॉट्सअॅपचा नंबर हा सर्वात वरचा आहे. खरं तर व्हॉट्सअॅप ही आजच्या तरुणाईची गरज झाली आहे. त्यामुळेच तरुणाईचा विचार करुन व्हॉट्सअॅपनं देखील या संपूर्ण वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

2017 हे वर्ष खरं तर बदलांचं वर्ष म्हणता येईल. आर्थिक, राजकीय, सामाजिक असे अनेक बदल या वर्षात पाहायला मिळाले. यासोबतच तंत्रज्ञानामध्येही अनेक मोठे बदल झाले. आजचा जमाना खरं तर सोशल मीडियाचा आहे. त्यामध्येही व्हॉट्सअॅपचा नंबर हा सर्वात वरचा आहे. खरं तर व्हॉट्सअॅप ही आजच्या तरुणाईची गरज झाली आहे. त्यामुळेच तरुणाईचा विचार करुन व्हॉट्सअॅपनं देखील या संपूर्ण वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आजच्या या ब्लॉगमधून आपण याचाच आढावा घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वर्षभरात व्हॉट्सअॅप केवढं बदललं ते... व्हॉट्सअॅपच्या स्टेट्स फीचरमध्ये बदल  2017च्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी फेब्रुवारी महिन्यातच व्हॉट्सअॅपनं एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आपलं 'स्टेट्स' हे सर्वात महत्त्वाचं फीचर बदलण्याचा निर्णय घेतला... स्टेटस हे फीचर लाँच केल्यानंतर अनेक यूजर्सनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. नव्या स्टेट्स फीचरमध्ये यूजर्सना फोटो, व्हिडीओ, जीआयएफ, टेक्स फोटो असं बरंच काही अपलोड करता येतं. पण जुन्या स्टेट्स फीचरला सरावलेल्या यूजर्सनं सुरुवातीलाच नव्या स्टेट्सला नापसंती दर्शवली. पण तरीही व्हॉट्सअॅप कंपनीनं आपला संयम राखला. ते एका अर्थी योग्यही ठरलं. कारण जसजशी वेळ जाऊ लागली. तसतसं नवं स्टेट्स फीचर हे सगळ्यांना आवडू लागलं. त्याचा वापरही बराच होऊ लागला. आजच्या घडीला सर्वाधिक वापरलं जाणारं फीचर स्टेट्सच आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्सअॅप हा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. त्यानंतर संपूर्ण वर्षभर त्यांनी अनेक बदल आपल्या अॅपमध्ये आणले. टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर  एकीकडे यूजर्ससाठी उपयुक्त फीचर आणत असताना दुसरीकडे व्हॉट्सअॅपनं सुरक्षेच्या दृष्टीनं काम सुरु ठेवलं होतं. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्हॉट्सअॅपनं स्टेप-टू व्हेरिफिकेशन हे फीचर लाँच केलं. अनेक जणांचे व्हॉट्सअॅप हॅक होण्याचा तक्रारी समोर आल्यानंतर स्टेप-टू व्हेरिफिकेशन हे फीचर तयार करण्यात आलं. या सिक्युरिटी फीचरच्या वापरासाठी यूजर्सला व्हॉईसअॅपच्या सेटिंगमध्ये जावं लागतं. त्यानंतर सेटिंगच्या अकाउंटमध्ये जावं लागतं. तिथे टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करावं लागेल. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा सहा आकडी पासकोड तयार करावा लागतो. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागतो. पासकोड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येतो. या फिचरमुळे तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट आणखी सुरक्षित करण्यात आलं.  कारण की, तुमचा 6 आकडी पासकोड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्ह करु शकत नाही. 'नाईट मोड' फीचर  टेक्स्ट फीचर आणि इमोजी अपडेटनंतर व्हॉट्सअॅप मंद प्रकाशात उत्तम फोटोसाठी 'नाईट मोड' हे फीचर या वर्षी लाँच केलं. व्हॉट्सअॅपचं नाईट मोड फीचर हे इतर अॅपच्या नाईट मोडप्रमाणे नव्हतं. दुसऱ्या अॅपमध्ये UI डार्क  केलं जातं, जेणेकरुन युझरच्या डोळ्यांवरील तणाव कमी होतो. तर व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर त्याच्या कॅमेरा फीचरमध्ये स्पष्टता आणतं. या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतात. कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमताही या फीचरमध्ये देण्यात आली. फेसबुकसारखं 'कलरफुल टेक्स्ट स्टेटस' फीचर व्हॉट्सअॅपनं ऑगस्ट महिन्यात कलरफुल टेक्स्ट  हे फीचर आणलं होतं. या फीचरसाठी स्टेटस टॅबमध्ये कॅमेरा आयकॉनच्यावर एक फ्लोटिंग पेन्सिल असणार आहे. या फ्लोटिंग पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर कलर टेक्स्ट अपलोड करता येतं. इथं व्हॉट्सअॅप तीन ऑप्शन देईल. तुम्ही इमोजी अॅड करु शकता, फॉन्ट सिलेक्ट करु शकता किंवा बॅकग्राऊंड कलरही बदलू शकता. ज्यामुळे तुमचं टेक्स्ट कलरफुल होईल. 'पिक्चर टू पिक्चर' फीचर 2017च्या सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपनं 'पिक्चर टू पिक्चर' हे फीचर आणलं होतं. पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येतं. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन यूजर्स चॅटिंगही करु शकतो. या फीचरला PiP या नावाने ओळखलं जात. लाईव्ह लोकेशन शेअर फीचर  लाईव्ह लोकेशन शेअर करण्याचं एक खास फीचर यावर्षी व्हॉट्सअॅपनं लाँच केलं. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन, Attach वर क्लिक केल्यानंतर तिथे लोकेशनचा पर्याय दिसतो. तो निवडल्यानंतर तुम्हाला कालमर्यादा विचारली जाते. यामध्ये 15 मिनिट, 1 तास आणि 8 तास असे पर्याय दिसतात. तो आपल्या सोईनुसार निवडता येतो. लाईव्ह लोकेशन तुम्ही म्यॅनुअली बंदही करता येतं. व्हॉट्सअॅपच्या Live Location फीचरमुळे तुम्ही लोकेशन शेअर केलं आणि प्रवास सुरु असेल, तर तुमचं लाईव्ह लोकेशन कळू शकतं. Live Location हे कोणालाही पर्सनल व्हॉट्सअॅप किंवा ग्रुपवर पाठवता येतं. 'रिकॉल' फीचर  व्हॉट्सअॅपनं यावर्षी आणखी एक महत्त्वाचं रिकॉल असं फीचर लाँच केलं. यामध्ये यूजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये सेंड केलेला मेसेज अनसेंड किंवा डिलीट करु शकत होता. अनेक प्रयत्नांनंतर व्हॉट्सअॅपनं हे फीचर लाँच केलं. मेसेज पाठवल्यानंतर सात मिनिटांच्या आतच तो डिलीट करता येतो. चुकून पाठवलेला मेसेज जर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर डिलीट ऑप्शनवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर ही अपडेट तुम्हाला मिळाली असेल तर तीन पर्याय येतील. डिलीट फॉर एव्हरीवन, डिलीट फॉर मी आणि कॅन्सल असे तीन पर्याय येतात. डिलीट फॉर एव्हरीवन केल्यास समोरच्या व्यक्तीकडचाही मेसेज डिलीट होतो. तर डिलीट फॉर मी केल्यास तुमच्या मोबाईलमधून मेसेज डिलीट होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget