एक्स्प्लोर
Advertisement
YAAO चा नवा स्मार्टफोन, 10,900 mAh क्षमतेची बॅटरी, किंमत फक्त 2,200 रुपये
मुंबई : स्मार्टफोन बाजारात नव्याने येणाऱ्या हँडसेट्समध्ये उत्तम प्रोसेसर आणि उत्तम डिस्प्ले यांच्यावरच अधिक भर दिला जातो. मात्र, अशा आकर्षक स्मार्टफोनमध्येही बॅटरीची समस्या कायम जाणवते. म्हणजेच बॅटरी बॅकअपची सुविधा चांगली नसते. यूझर्सच्या या समस्येकडे विशेष लक्ष देत YAAO कंपनीने एक स्मार्टफोन बाजारात आणला आहे, ज्यामुळे बॅटरीची समस्या दूर होईल.
YAAO 600 प्लस स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. यूझर्सची बॅटरीची समस्या दूर करण्यासाठी हा स्मार्टफोन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनमध्ये 10 हजार 900 mAh क्षमतेची बॅटरी आहे. विशेष म्हणजे एखाद्या पॉवरबँकपेक्षाही अधिक क्षमतेची बॅटरी आहे.
JD.com या वेबसाईटवर YAAO 600 प्लस स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
फीचर्स :
- 18.1 mm जाडी
- मेटल बॉडी
- 5.5 इंच स्क्रीन (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 1.5GHz क्वार्डकोर मीडियाटेक प्रोसेसर
- 1 जीबी रॅम
- 4G LTE
- 16 जीबी इंटरनल मेमरी
- 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. या फ्लॅगशिपची किंमत 218 युआन म्हणजेच 2 हजार 200 रुपये आहे. भारतात या स्मार्टफोनची विक्री कधीपासून करण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement