एक्स्प्लोर
Advertisement
शाओमीचा बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप रेडमी Note 4 लॉन्च
मुंबई : शाओमीने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन रेडमी नोट 4 चीनमध्ये लॉन्च केला आहे. नोट सीरीजमधील हा नवा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 2 जीबी रॅम आणि 16 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 9 हजार रुपये, तर 3 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 12 हजार रुपये आहे. 26 ऑगस्टपासून या स्मार्टफोनची विक्री mi.com वेबसाईटवरुन सुरु होणार आहे.
शाओमीच्या या नव्या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे मेटल फिनिश. एवढ्या किंमतीत मेटल फिनिश, हेच स्मार्टफोनप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.
रेडमी नोट 4 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा 1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन
- 5D कव्हर्ड ग्लास
- 401ppi डेन्सिटी
- डेका कोर मीडियाटेक हेलियो X20 प्रोसेसर
- दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- दोन हायब्रिट सिम स्लॉट
- बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- ड्युअल एलईडी फ्लॅश
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4100mAh क्षमतेची बॅटरी
- जीपीआरएस
- 4G VoLTE
- ब्लूटूथ
- जीपीएस
- यूएसबी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement