(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Redmi 9A | प्रतीक्षा संपली, भारतात 'या' तारखेला लॉन्च होणार हा स्वस्तात मस्त फोन
भारताच्या स्मार्टफोन बाजारात Xiaomi या ब्रँडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीचा बहुप्रतीक्षित Redmi 9A ची भारतातील लॉन्चिंगची प्रतीक्षा संपली आहे.
नवी दिल्ली : भारताच्या स्मार्टफोन बाजारात Xiaomi या ब्रँडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Xiaomiचे अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आता कंपनीचा बहुप्रतीक्षित Redmi 9A ची प्रतीक्षा संपली आहे. भारतात हा फोन 2 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi नं शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन देशात Redmi 9 सिरीजचा तिसरा फोन आहे.
Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा अंदाज बांधण्यात येत आहे की, कंपनी आपले अपकमिंग फोन Redmi 9 या सीरिजमध्ये Redmi 9A किंवा Redmi 9C लॉन्च करू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं.
Redmi 9A आणि Redmi 9C
स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Xiaomi ने Redmi 9A आणि Redmi 9C ला मलेशियात लॉन्च केलं आहे. Redmi 9A चे 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेले व्हेरिएन्टंस मिडनाइट ग्रे, पीकॉक ग्रीन आणि ट्वाइलाइट ब्लू या रंगांमध्ये बाजारात लॉन्च केले आहेत. Xiaom च्या Redmi 9A ची किंमत जवळपास 6,300 रुपये आहे. तर कंपनी Redmi 9C च्या 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएन्टंसला जवळपास 7,500 रुपयांत ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकते.
दोन्ही फोन अन्ड्राइड 10वर आधारित MIUI 11 ला सपोर्ट करते. Xiaom चे Redmi 9A आणि Redmi 9C दोन्ही फोन्समध्ये 6.53 इंचाचा एचडी+ (720x1,600 पिक्सल) एलसीडी डॉट ड्रॉप डिस्प्ले ग्राहकांना देण्यात आला आहे. Redmi 9A मध्ये मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर, तर Redmi 9C मध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. Redmi 9A मध्ये सिंगल रियर कॅमेरा असून Redmi 9C मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.