एक्स्प्लोर
Advertisement
राजकीय पक्षांकडून दुरुपयोग होत असल्याचा व्हॉट्सअॅपचा दावा
मतदारांची दिशाभूल करण्यासाठी किंवा खोट्या बातम्या पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर होत असल्याची चिंता कंपनीने व्यक्त केली आहे. व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग होत राहिल्यास भारतातील सेवा लवकरच बंद करण्याचा विचार असल्याचं व्हॉट्सअॅपचे कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटलं आहे.
मुंबई : आगामी 2019 लोकसभा निवडणुकांसाठी व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग थांबवा, असा इशारा व्हॉट्सअपने राजकीय पक्षांना दिला आहे. यावेळी व्हॉट्सअपनं कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलेलं नाही. शिवाय राजकीय पक्षांकडून कशाप्रकारे व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग होत आहे, हे देखील कंपनीने सांगितलं आहे.
मतदारांची दिशाभूल करण्यासाठी किंवा खोट्या बातम्या पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर होत असल्याची चिंता कंपनीने व्यक्त केली आहे. व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग होत राहिल्यास भारतातील सेवा लवकरच बंद करण्याचा विचार असल्याचं व्हॉट्सअॅपचे कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटलं आहे.
भारतात राजकीय पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करत आहेत, असं व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे. तसंच येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना भडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेक बातम्या पसरवण्याची शक्यता आहे, अशी चिंता व्हॉट्सअॅपकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा सरस आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते सोशल मीडियावर कोणत्याही पातळीला जात असताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक वेळा हा वाद टोकाला जातानाही समोर आलं आहे.
सर्वच पक्षांनी सध्या आपआपल्या पक्षात मीडिया सेल सक्रिय केलं आहे. गावापासून, जिल्हा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांना सोशल मीडिया सेलची पद देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात सोशल मीडियावर स्पर्धा लागली आहे. शिवाय कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअॅपवर अफवा पसरवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं व्हॉट्सअॅपने सांगितलं आहे. तसेच हे सर्व बंद झालं नाही तर भारतात व्हॉट्सअॅप सेवा बंद करु, असं देखील व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement