एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार
सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानलं जाणारं व्हॉट्सअॅप लवकरच आपलं नवीन अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपनं लॉन्चिंगनंतर अद्याप कोणतही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारलं नाही. मात्र हे नवीन अॅप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळत आहे.
मुंबई : सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानलं जाणारं व्हॉट्सअॅप लवकरच आपलं नवीन अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपनं लॉन्चिंगनंतर अद्याप कोणतही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारलं नाही. मात्र हे नवीन अॅप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळत आहे.
ट्विटरवरील @WABetaInfo या अकाऊंटनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप आता मध्यम आणि लहान व्यावसायिकांना लक्ष्य करत त्यांच्यासाठी व्यावसायिक सुविधा पुरवण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपचं हे नवं अप अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध असेल. आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी यूझर्सना वेगवेगळे फीचर्सही देण्यात येणार आहेत. सध्या या अॅपचं टेस्टिंग सुरु असून लवकरच हे अॅप लॉन्च केलं जाणार आहे.
व्हॉट्सअॅपचं हे अॅप वापरण्यासाठी ते प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावं लागेल. तसंच एकाचवेळी ही दोनही अॅप मोबाईलमध्ये वापरता येतील. हे अॅप विविध भाषांमध्ये उपलब्ध असेल, तसंच यात व्हेरीफाईड आणि नॉन व्हेरीफाईड असे अकाऊंटचे दोन प्रकार असतील. आणखी काय नवीन असेल या नव्या व्हॉट्सअॅपमध्ये हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement