WhatsApp Cover Photo : आता फेसबुकसारखा कव्हर फोटो WhatsApp profile वरही ठेवता येणार, लवकरच येणार नवं फीचर
WhatsApp Cover Photo : मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएप एका नवीन फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना लवकरच त्यांच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर कव्हर फोटो सेट करता येणार आहे.
WhatsApp Cover Photo : WhatsApp बीटा ट्रॅकर WABetaInfo नुसार, इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp कॅटलॉग व्यवस्थापित करण्यासाठी नवीन फीचरवर काम करत आहे, "WhatsApp आता यूजर्ससाठी आणखी एका फीचरवर काम करत आहे. यामध्ये लवकरच WhatsApp अपडेट होऊन त्यामध्ये फेसबुकसारखा कव्हर फोटो अपडेट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
WABetaInfo ने पुढे सांगितले आहे की, सध्या या फीचरवर टेस्टींग सुरु आहे. "जेव्हा हे फीचर बीटा परीक्षकांकडून पास केले जाईल तेव्हा तुमच्या बिझनेस प्रोफाईल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील.
काय आहे नेमकं फीचर?
“WhatsApp तुमच्या बिझनेस सेटिंग्जमध्ये कॅमेरा बटण आणण्याची योजना आखत आहे. याद्वारे तुम्ही फेसबुकसारखा कव्हर फोटो म्हणून वापरू शकता.” हे नवीन बिझनेस प्रोफाईलला भेट देणाऱ्या मानक WhatsApp यूजर्सच्या अकाऊंटसह इतर यूजर्सना कव्हर फोटो पाहण्याची परवानगी देईल. iOS साठी WhatsApp Business वरून स्क्रीनशॉट घेतला असला तरीही हे कार्य करेल. “WhatsApp Android साठी WhatsApp Business वर देखील हेच फीचर अपडेट करण्याचा विचार करत आहे.”
नवीन फीचरवर सध्या काम सुरु असल्याने या संदर्भात अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, मेसेजिंग प्लॅटफॉर्म भविष्यातील अपडेटमध्ये 'community' फीचरवरदेखील काम करत आहे. WABetaInfo नुसार, community ही एक खाजगी जागा आहे जिथे व्हॉट्सअॅपवरील काही ग्रुपवर ग्रुप अॅडमिनचे अधिक नियंत्रण असेल. पुढे असं सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअॅप कम्युनिटी हे ग्रुप चॅटसारखे आहे. या माध्यमातून ग्रुप अॅडमिन्स कम्युनिटीतील इतर ग्रुप्सशी लिंक करू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Budget 2022 : यंदा येणार 5G , अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha