Budget 2022 : यंदा येणार 5G, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
5G Service in India : सध्या इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षण आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5जी (5G) सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
![Budget 2022 : यंदा येणार 5G, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा 5G mobile services 5G Spectrum auction in 2022 should do a follow up story later today Budget 2022 : यंदा येणार 5G, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/96358b0aad2fcaed4d785333b17f4e9e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
5G Service in India : सध्या इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आता आपण 4जी (4G) स्पीड इंटेरनेट सुविधा पावरत आहोत, त्याआधी 3जी (3G) सुविधा वापरात होती. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5जी (5G) सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 5जी सुविधा भारताला प्रगतीकडे एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे.
सीतारमण यांनी सांगितले की, 2022 मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव (Spectrum Auction) आयोजित केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड (Broadband) आणि मोबाईल कम्युनिकेशन (Mobile Communication) सक्षम करण्यासाठी PLI योजनेचा एक भाग म्हणून 5G इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल. परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी, निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5 टक्के वाटप केले जाईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या आर्थिक वर्षापासून 2022-23 पासून डिजिटल रुपया चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी लागू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून डिजिटल चलनाबाबत चर्चा सुरू होती. आता डिजिटल चलनाबाबत अर्थसंकल्पीय भाषणात शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
- Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
- Budget 2022: रेल्वे प्रवास सुस्साट होणार! तीन वर्षात 400 'वंदे भारत' ट्रेन धावणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा
- Education Sector Budget 2022 : शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन 100 चॅनेलची घोषणा, मातृभाषेत शिक्षण मिळणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)