एक्स्प्लोर
WhatsApp द्वारे GIF व्हिडीओ कसा पाठवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
जर आपण एखाद्याला वाढदिवसाच्या किंवा वर्धापन दिनानिमित्त व्हॉट्सअॅपवर शुभेच्छा देत असाल आणि व्हिडीओचा GIF तयार करुन पाठवायचा असेल तर हे खूप सोपे आहे. Android आणि iPhone वापरणारे दोन्ही काही सेकंदात GIF व्हिडिओ पाठवू शकतात
आजकाल बहुतेकजण लोक स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सर्वाधिक वापरले जाणारे अॅप बनले आहे. व्हॉट्सअॅपचा वापर सामान्यपणे कॉल, चॅट, व्हिडिओ कॉल, फोटो आणि व्हिडिओ पाठविण्यासाठी केला जातो. व्हॉट्सअॅपवर बर्याचवेळा लोक मोठा व्हिडिओ एडिटकरुन GIF फाईलमध्ये रूपांतरित करतात. व्हॉट्सअॅपवर अनेक फोटो आणि व्हिडिओ जीआयएफ स्वरूपात येतात. आपणास व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडियोचे अॅनिमेशन तयार करुन जीआयएफमध्ये रूपांतरित करायचे असेल तर ते अगदी सोपे आहे. जीआयएफ व्हिडिओ कसे बनवायचे किंवा व्हॉट्सअॅपवरील व्हिडिओंमध्ये अॅनिमेशन कसे अॅड करायचे जाणून घ्या.
Android फोन वरून GIF व्हिडिओ कसा पाठवायचा
- प्रथम व्हाट्सएप उघडा
- GIF व्हिडिओ पाठविण्यासाठी त्या व्यक्तीचा चॅटबॉक्स उघडा
- मग आपल्या फोटो गॅलरीवर जा
- गॅलरीमधून GIF व्हिडिओ बनवू इच्छित असलेला व्हिडिओ निवडा
- व्हिडिओ निवडल्यानंतर, त्यावर एक कालावधी येईल, त्यातील 5 ते 15 सेकंदांचा व्हिडिओ कट करा.
- व्हिडिओ कट केल्यानंतर, उजव्या बाजूस एक GIF पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ पाठवा.
Arattai | व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय, Zoho चं 'अराट्टई' अॅप चर्चेत!
आयफोनवरून जीआयएफ व्हिडिओ कसा पाठवायचा
- प्रथम व्हाट्सएप उघडा
- GIF व्हिडिओ पाठविण्यासाठी त्या व्यक्तीचा चॅटबॉक्स उघडा
- मग आपल्या फोटो गॅलरीवर जा
- उजवीकडील चिन्हावर क्लिक करा आणि जीआयएफ पाठवा
- आपल्याला थेट फोटोचा जीआयएफ पाठवायचा असेल तर फोटोवर जा आणि थेट फोटोवर क्लिक करा, लाँग प्रेसनंतर त्यामध्ये GIF पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा, तो लाइव्ह फोटो जीआयएफ व्हिडिओच्या रूपात जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement