एक्स्प्लोर
WhatsAppचं जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा येणार?
मुंबई: व्हॉट्सअॅ्पनं गुरुवारी आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त 'स्टेटस' फीचर लाँच केलं होतं. पण या नव्या फीचरमुळे अनेक यूजर्स नाखूश आहेत. अनेक यूजर्सना स्टेटस हे फीचर अजिबात आवडलेलं नाही. याच दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, व्हॉट्सअॅप आपलं जुनं फिचर पुन्हा आणू शकतं. जिथं यूजर्स पूर्वीप्रमाणे आपलं टेक्स फीचर ठेऊ शकतं.
जुनं फीचर हे नव्या नावानं रिलाँच केलं जाऊ शकतं. काही वृत्तानुसार, कंपनी आपलं जुनं फीचर Tagline नावानं पुन्हा आणू शकतं.
व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे. नव्या फीचरमध्ये यूजर्स व्हिडिओ, फोटो आणि जीआयएफ अपलोड करु शकतात. जे पुढील 24 तासापर्यंत तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्यांना दिसू शकतं. यासोबतचं तुम्ही तिथं टेक्स्ट स्वरुपात स्टेटसही ठेऊ शकतात. पण यामुळे जुनं टेक्स्ट स्टेटस गेलं आहे. त्यामुळे 24 तासानंतर तुम्हाला फोटो आणि स्टेटस बदलणं गरजेचं आहे. फेसबुकचंच सोशल मीडिया अॅप इंस्टाग्राममध्ये यापूर्वी स्टोरी फीचर आलं आहे. ज्यामध्ये तुम्ही फोटो, व्हिडिओ अपलोड करु शकतात. पण सध्या व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचरबाबत अनेकांनी नापसंती जाहीर केली आहे. त्यामुळे भविष्यात व्हॉट्सअॅप या फीचरबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या: WhatsAppचं यूजर्संना खास गिफ्ट!WhatsApp listened users and developers will restore the Old Status, calling it "Tagline" 😭🎉 Now we want multiple Privacy settings & TouchID😭
— WABetaInfo (@WABetaInfo) February 24, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement