WhatsApp New Features : व्हॉट्सअॅप होणार आणखी सुरक्षित; स्क्रीन शॉट घेण्यावर निर्बंध, सायलेंटली ग्रुप लेफ्ट, नवनवीन फिचर्सची पर्वणी
WhatsApp New Features : व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही फिचर्सचा समावेश होणार आहे. जाणून घेऊयात या नव्या फिचर्सबाबत....
WhatsApp New Features : चॅटिंग, व्हिडीओ कॉल आणि इतर फिचर्स असणाऱ्या व्हॉट्सअॅपचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये वेगवेगळे अपडेट्स येत असतात. युझर फ्रेंडली असणाऱ्या या अॅपमध्ये वेगवेगळे ग्रुप्स तयार करण्याचं देखील फिचर आहे. कुटुंबातील सदस्यांचा तसेच मित्रांचा ग्रुप, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा ग्रुप या ग्रुप्समध्ये अॅड झाल्यानंतर अनेक फॉरवर्ड मेसेज तुम्हाला लोक पाठवत असतील. पण बऱ्याच वेळा या ग्रुप्समधून लेफ्ट होता येत नाही म्हणजेच बाहेर पडता येत नाही. आता व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच एक नवे फिचर येणार आहे. या फिचरमधून सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. म्हणजे जर तुम्ही ग्रुप लेफ्ट केला तर ग्रुपमधील सदस्यांना ते कळणार देखील नाही. व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही फिचर्सचा समावेश होणार आहे. जाणून घेऊयात या नव्या फिचर्सबाबत....
तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकतात
व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर या महिन्यात येऊ शकते. यामध्ये तुम्ही तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकणार आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये ‘ऑनलाइन’ स्टेटस इंडिकेटर सेट करु शकता. तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे तुम्ही निवडलेल्या युझर्सलाच कळेल.
सायलेंटली करु शकता ग्रुप लेफ्ट
जर एखाद्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. या फिचरमध्ये तुम्ही जर ग्रुप लेफ्ट केला तर ते इतरांना कळणार नाही. पण तुम्ही ग्रुप लेफ्ट केल्यानंतर ग्रुप अॅडमिनला नोटिफिकेशन जाऊ शकते. हे फिचर देखील या महिन्यात येऊ शकते.
मेसेजचा स्क्रीनशॉट घेण्यावर निर्बंध
व्हॉट्सअॅपच्या “WhatsApp व्यू वन्स” या मेसेजचा स्क्रीनशॉट आता युझर्स घेऊ शकणार नाहीत. WhatsApp व्हू वन्स मेसेज तुम्ही एकदाच पाहू शकता. आता स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे नवे फिचर व्हॉट्सअॅप लाँच करणार आहे. या फिचर नुसार तुम्ही स्क्रीनशॉट ब्लॉक हा पर्याय निवडू शकता. यामुळे युझर कोणत्याही WhatsApp व्हू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. मार्क झुकरबर्गने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या नव्या फिचर्सची माहिती दिली होती.
वाचा इतर बातम्या: