WhatsApp update : व्हॉट्सअॅप ग्रुप युजर्सची संख्या होणार दुप्पट, एका वेळी ग्रृपमध्ये 512 लोकांना करता येणार अॅड
WhatsApp update : व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या जास्तीत जास्त 256 यूजर्संना सहभागी करून घेता येते. या पुढे वापरकर्ते एका ग्रृपमध्ये 512 लोकांना सहभाजी करून घेऊ शकतील.
WhatsApp update : व्हॉट्सअॅपकडून नवीन अपडेट्स जारी करण्यात आले आहे. नव्या अपडेट्सनुसार व्हॉट्सअॅपने ग्रुप वापरणाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये आता एका वेळी 512 लोकांना सहभागी करून घेता येणार आहे. व्हॉट्सअॅपकडून लवकरच हे नवे अपडेट्स येणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या जास्तीत जास्त 256 यूजर्संना सहभागी करून घेता येते. पण कधी कधी ही संख्या अधिक होते, अशा परिस्थितीत एकाच कामासाठी दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावे लागतात. तसेच ते अपडेट आणि स्वतंत्रपणे मॅनेज करावे लागतात. मात्र , लवकरच या समस्येतून सुटका होऊ शकते. कारण व्हॉट्सअॅपद्वारे ग्रुप यूजर्सची संख्या 256 वरून 512 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅप ब्लॉगने गुरुवारी व्हॉट्सअॅपच्या आगामी वैशिष्ट्यांची एक लांबलचक यादीच सादर करण्यात आली आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप चॅटचा आकार वाढवण्याची माहिती देण्यात आली आहे. वापरकर्ते एका ग्रृपमध्ये 512 लोकांना सहभाजी करून घेऊ शकतील. परंतु, हे वैशिष्ट्य प्रत्येकासाठी उपलब्ध होणार नाही. कंपनी टप्प्याटप्प्याने या फीचरचा विस्तार करणार आहे.
लवकरच नवीन वैशिष्ट्ये मिळणार
व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर लवकरच काही नवीन फीचर्स दिले जाणार आहेत. याशिवाय व्हॉट्सअॅपवर शेअर करायच्या फाईलचा आकार दोन जीबीपर्यंत वाढवला जाईल. सध्या ही मर्यादा 100MB आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असते. यूजर्सचा चॅटिंग अनुभव जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी कंपनीकडून नवीन फीचर्स आणले जातात. आता देखील कंपनीकडून नवीन फीचरवर काम सुरू आहे. कंपनीने हे फीचर जारी केल्यानंतर यूजर्स गुगल ड्राइव्हच्या चॅट बॅकअपला देखील एक्सपोर्ट करता येणार आहे. त्यामुळे अन्य सर्व्हर आणि डिव्हाइसमध्ये बॅकअप घेणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट जारी केल्यानंतर गुगल ड्राइव्हवर स्टोर असलेल्या चॅटला पेन ड्राइव्हमध्ये घेणे शक्य होणार आहे.
महत्वाच्या बातम्या