WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश
WhatsApp Telegram Guidelines : व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्सवरील नवीन आदेश काही केसेसचा अभ्यास केल्यानंतर देण्यात आले आहेत.
![WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश whatsapp and telegram do not use for this purpose check govt guidelines WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/24/cf490f4e4f899d05270b6cf96b2fbaeb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WhatsApp Telegram Use : खरंतर व्हॉट्सअॅप (WhatsApp)आणि टेलिग्रामसारखे (Telegram) अॅप सोशन मिडीयावर सर्वाधिक वापरले जाणारे आहेत. या अॅपच्या माध्यमातनू वैयक्तिक माहिती किंवा डेटा जवळच्या व्यक्तींना तसेच ऑफिशियल कामासाठी सोयीचा ठरतो. पण, आता याच सोशल मीडिया अॅप्सवरून पर्सनल डेटा किंवा डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी सुरक्षित राहणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने अधिकाऱ्यांना दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पर्सनल डेटा सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडिया अॅप्स वापरू नयेत असे आदेश दिले आहेत. याचं कारण असं की, या अॅप्सचे सर्व्हर जगभरातील खासगी कंपन्यांच्या मालकीचे असून, भारताविरोधी या डेटाचा गैरवापर केला जाऊ शकतो. यासाठी हा आदेश Amazon Alexa, Apple HomePod, Google Meet, Zoom आणि इतर सोशल मिडीया साईट्सनादेखील लागू होतो.
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्ससाठी हा आदेश काही केसेसचा अभ्यास केल्यानंतर देण्यात आला आहे. केंद्राने देशव्यापी कम्युनिकेशन नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचं उल्लंघन होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यामध्यमातून कम्युनिकेश सुरक्षा विमा पॉलिसी आणि सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.
नवीन निर्देशात असं म्हटलं आहे की,वर्क फ्रॉम होम करताना संवेदनशील माहिती किंवा डॉक्युमेंट्स सेटअपद्वारे शेअर करणे टाळावे. तसेच, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे केवळ ऑफिशिल कामाच्या संबंधितच माहिती सेव्ह करावी. याशिवाय, सर्व केंद्रीय मंत्रालयांना तसेच विभागांना या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यास सांगितलं आहे. तर, उच्च अधिकार्यांना पर्सनल किंवा देशव्यापी सुरक्षेच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा होत असताना संमेलनाच्या दरम्यान स्मार्ट-वॉच किंवा स्मार्ट फोनचा वापरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)