एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स
व्हॉट्सअॅप सध्या व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच या फीचरवर काम करत आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करु शकता. मात्र आता कॉलिंगसाठी व्हॉट्सअॅप आणखी एक चांगलं फीचर देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच करता येईल.
WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप सध्या व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच या फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल.
या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. स्वीच फीचरची चाचणी करत असताना रेकॉर्डिंगचाही टॉगल दिसून आला, ज्यामुळे रेकॉर्डिंग लॉक केली जाऊ शकते. लॉक झाल्यामुळे कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
व्हॉट्सअॅपने गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना हवे असणारे फीचर दिले आहेत. व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग फीचरचीही गेल्या अनेक दिवसांपासून युझर्सना प्रतीक्षा होती. अखेर व्हॉट्सअॅपने या फीचरवर काम सुरु केलं आहे.
संबंधित बातम्या :
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या
व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम
Advertisement